- संजय मानेपिंपरी : नव्या वर्षाच्या पदार्पणातील जानेवारी महिना पूर्ण होईपर्यंत शहरात विविध ठिकाणी रस्त्यावरील गाड्यांच्या तोडफोडीच्या पाच घटना घडल्या आहेत. विशेष म्हणजे किरकोळ कारणांवरून, तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी तरुणांच्या टोळक्यांकडून वाहन तोडफोडीचे सत्र सुरू असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत.साधारण नेहरूनगर, खराळवाडी, थेरगाव, डांगे चौक, भोसरी, सांगवी, दिघी, आकुर्डी, देहूरोड, प्राधिकरण अशा विविध भागांत महिन्यातून किमान एक ते दोन वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात २०१६ पासून वाहन तोडफोड, जाळपोळीच्या घटनांचे सत्र सुरू आहे.गेल्या सहा महिन्यांत शहरात १५ घटना घडल्या असून, आतापर्यंत सुमारे २०० हून अधिक दुचाकी, १२५ मोटारींचे नुकसान झाले. सुमारे ४०० वाहनांचे नुकसान झाल्याची पोलिसांकडे नोंद आहे. पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे कठोर पाऊल उचलल्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. त्यामुळे सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.प्राधिकरणात १५ वाहनांचे नुकसानप्राधिकरणासारख्या उच्चभ्रू वस्तीत वाहनांची तोडफोड करण्याचे प्रकार घडू लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. उच्चभ्रू, अत्यंत शांत आणि सुरक्षित गणल्या जाणाºया प्राधिकरण परिसराला वाहनांच्या तोडफोडीच्या प्रकाराने दहशतीच्या घटनेचे गालबोट लागले आहे. दीडशे आरोपींवर गुन्हे दाखल वाहनांची तोडफोड आणि जाळपोळ करणाºया सुमारे १५० आरोपींविरोधात आतापर्यंत गुन्हे दाखल झाले आहेत. विविध पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले असून अनेक घटनांमधील आरोपी अज्ञात आहेत. पोलीस नेमक्या गुन्हेगारांचा शोध घेऊ शकलेले नाहीत. ज्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, अशा ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून काही आरोपींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. काही आरोपींविरोधात नागरिक तक्रार देण्यास पुढे येत नसल्याने ते मोकाट सुटले आहेत. पोलिसांनी त्यांच्या परीने कारवाई करावी, वाहनांचे तोडफोड सत्र रोखावे, अशी मागणी होत आहे.अशा आहेत तोडफोडीच्या घटनाकैलासनगर, २२ वाहनांचे नुकसान : वर्चस्व सिद्ध करण्यासाठी, तसेच नागरिकांमध्ये दहशत निर्माण करण्याकरिता स्थानिक गुंड कधी वाहनांची जाळपोळ, तर कधी तोडफोड करू लागले आहेत. शहराच्या विविध भागांत या घटना घडू लागल्या असून, थेरगावातील कैलासनगर भागात रहिवाशांनी घरासमोर लावलेल्या वाहनांवर मोठे दगड फेकले. २२ मोटारींच्या काचा फोडल्या.संत तुकारामनगरमध्ये ७ मोटारी फोडल्या : संत तुकारामनगर आणि थेरगाव या दोन ठिकाणी अज्ञातांनी वाहनांची तोडफोड करून नुकसान केले. या घटना पहाटेच्या सुमारास घडल्या. चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. दोन्ही घटनांत १७ वाहनांचे नुकसान झाल्याची पोलिसांकडे नोंद आहे.वाल्हेकरवाडीत ५ मोटारींचे नुकसान : पोलीस यंत्रणा बंदोबस्तात व्यस्त असल्याचा फायदा उठवत वाल्हेकरवाडीत टवाळखोरांनी पाच मोटारींच्या काचा फोडल्याची घटना घडली. पोलिसांनी दोन दिवसांनी आरोपींना जेरबंद केले.नागरिकांमध्ये दहशत कायमआनंदनगरमध्ये दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीची घटना घडली. दगडफेक करून दुचाकी आणि तीन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले. तडीपार गंडाने जामिनावर सुटून बाहेर आल्यानंतर आनंदनगरमध्ये गुंडांच्या टोळक्याने धुडगूस घातला. वाहनांची तोडफोड केली. नागरिकांमध्ये दहशत माजविण्याचा प्रयत्न करणाºयांना पकडण्यासाठी पोलीस येताच टोळके पसार झाले. विठ्ठलनगर, नेहरुनगर येथे अशाच प्रकारे स्थानिक गुंडांनी दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. दगडफेक करून वाहनांचे नुकसान केले. पोलिसांनी टोळक्याविरुद्ध तडीपारीची कारवाई केली. पोलिसांनी गुंडांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला. पोलीस कठोर कारवाईचे पाऊल उचलतात, या भीतीने अन्य परिसरातील अशा घटनांवर नियंत्रण येणे अपेक्षित होते. मात्र तसे न घडता तोडफोडीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे.मोशीत टोळक्याचा धुमाकूळआळंदी-मोशी येथे एका टोळक्याने दहशत पसरविण्यासाठी दोन चारचाकी फोडल्या. मात्र, त्यातील एक जण दुचाकीवरून पसार होत असताना धडपडला आणि नागरिकांच्या हाती लागला. नागरिकांनी चांगला चोप दिला. ही घटना अगदी अलीकडची आहे.
उद्योगनगरीत वाढली गुन्हेगारी : महिन्यात तोडफोडीच्या ५ घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2018 3:46 AM