पुणो : छंद म्हणून अनेक वर्षापासून तो नाणी साठवत होता. त्यामध्ये जुन्या, दुर्मीळ आणि परकीय नाण्यांबरोबरच भारतीय नाण्यांचाही समावेश होता. त्याच्याकडे 5क् पैशांची पाच हजार नाणी साठली आणि त्याची नोंद ‘इंडिया बुक’ ऑफ रेकॉर्ड्सने घेतली आहे. एवढय़ा मोठय़ा प्रमाणात 1982 पासूनची नाणी साठविणारा तो एकमेव युवक आहे. लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये 2क्15 साली त्याचे नाव घेण्याचे संबंधित संस्थेने त्याला सांगितले असून, जागतिक स्तरावरही या संग्रहाची नोंद होणार आहे.
निखिल गाडे असे या युवकाचे नाव आहे. लहानपणापासून त्याला विविध नाणी साठविण्याची आवड होती. तो धनकवडीतील रहिवासी असून, त्याचे वडील दत्तात्रय गाडे हे पोलीस आहेत. निखिल सध्या पुणो विद्यापीठामध्ये एमए करत आहे. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे आणि पाठिंब्यामुळे त्याने नाण्यांच्या संग्रह केला. त्याच्याकडे साडेपाच हजार विविध प्रकारची आणि दुर्मीळ नाणी आहेत. त्यामध्ये 5क् पैशांची पाच हजार नाणी आहेत. गेल्या 25 वर्षात केंद्र सरकारने चलनात आणलेली विविध प्रकारची नाणी यामध्ये आहेत. याचीच दखल ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ ने घेतली आहे. या संदर्भातील नोंदणीचे प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह सोमवारी निखिलला त्याच्या घरी प्राप्त झाले. यापूर्वी, एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर कोणीही संग्रह केलेला नाही. त्यामुळे प्रथमच हा संग्रह केला असल्याने त्याची दखल घेण्यात येत असल्याचे या प्रमाणपत्रमध्ये नमूद करण्यात आले आहे.
निखिलला लेखनाची आवड आहे. आपल्या भागातील सामाजिक समस्या त्याने विविध वृत्तपत्रंमधून वाचकांचा पत्रव्यवहारमध्ये मांडल्या आहेत. त्याबद्दल विविध संस्थांनी त्याल पुरस्कार दिले आहेत. त्याला पोलीस अधिकारी व्हायचे आहे.
माङया संग्रहाची इंडिया बुक रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली. त्याविषयीचे सन्मानचिन्ह मिळाल्यानंतर खूप आनंद वाटला. मला प्रेरणा देणारे माङो वडील, शाळेतील मुख्याध्यापक यांच्या प्रयत्नांना यश आले. वडिलांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळेच मी हे यश मिळवू शकलो. या संग्रहाची माहिती लिम्का बुकसाठी पाठविली आहे. त्यांनीही याची नोंद 2क्15 मध्ये घेणार असल्याचे कळविले आहे.
- निखिल गाडे, संग्राहक
‘लोकमत’ची प्रेरणा
निखिल गाडे हा ‘लोकमत’चा नियमित वाचक आहे. नुकतेच लोकमतच्या श्रीगणोशोत्सवातील चित्र रंगविण्याच्या भव्य स्पर्धाची नोंद ग्रिनिज बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये घेण्यात आली. त्याची प्रेरणा घेऊनच माङया संग्रहाची सर्व माहिती मी इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्सच्या दिल्लीतील कार्यालयाला पाठविली असल्याचे निखिलने सांगितले.