पुणे : मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. तसेच कोकण, गोव्याच्या काही भागात व विदर्भाच्या उर्वरित भागात किंचित घट झाली आहे़ राज्यात रविवारी सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १२़२ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ गोव्यासह राज्यात हवामान कोरडे होते़बंगालचा उपसागर, तामिळनाडू, दक्षिण आंध्र प्रदेशची किनारपट्टी या परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे सध्या तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेशमध्ये जोरदार वृष्टी होत आहे़ पुढील दोन दिवस हा पाऊस राहणार आहे़ पंजाब आणि उत्तर राजस्थानमध्ये दाट धुके पडण्याची शक्यता आहे़पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात काहीशी वाढ झाली आहे़ मराठवाड्यातील काही भागातही शनिवारच्या तुलनेत किमान तापमानात किंचित वाढ झाली आहे़ पुणे शहरात रविवारी किमान तापमान १३ अंश सेल्सिअस नोंदविले गेले़ दिवसाच्या तापमानात किंचित वाढ होण्याची शक्यता आहे़प्रमुख शहरांतील किमान तापमानपुणे १३, जळगाव १४़४, कोल्हापूर १९़३, महाबळेश्वर १४़२, मालेगाव १५़४, नाशिक १२़२, सांगली १८़६, सोलापूर १५़९, मुंबई २४़५, सातांक्रुझ २२़६, अलिबाग २२़३, रत्नागिरी २२़३, पणजी २३, डहाणु २०़२, उस्मानाबाद १२़५, औरंगाबाद १५, परभणी १४़५, नांदेड १६़२, अकोला १६़५, अमरावती १६़४, बुलढाणा १६़२, ब्रम्हपुरी १५़३, चंद्रपूर १८़६, गोंदिया १५, नागपूर १५़२, वाशिम १५़८, वर्धा १५़५, यवतमाळ १४़५़(अंश सेल्सिअस)
मध्य महाराष्ट्रात थंडी वाढली, नाशिक येथे सर्वांत कमी तापमानाची नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 06, 2017 5:13 AM