शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

पैसे मिळवण्यासाठी सह्या घ्या अन् सभेनंतर भेटा; अनेकांना भाषणापेक्षा सह्यांची चिंता

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 4:02 PM

सध्याच्या परिस्थितीत राजकीय पक्षांना, नेत्यांना कार्यकर्त्यांची फौज उभे करणे शक्य नसल्याने, आपल्यावरील प्रेम दाखविण्यासाठी अशा विकतच्या प्रेमाचा आधार

निलेश राऊत

पुणे: निवडणूक ती कोणतीही असो मग ग्रामपंचायत पासून ते लोकसभेपर्यंत. या निवडणुकीत प्रचार सभांना गर्दी जमविणे म्हणजे मोठे चॅलेंज. व आलेली लोक शेवटपर्यंत म्हणजे सभा संपेपर्यंत थांबविणे ही मोठी कसोटीच. पण यात स्लिप वरील सह्यांचा सध्या चांगला फंडा दिसून येत आहे.     आजमितीला लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडत आहे. दोन दिवसात जाहीर प्रचार संपेल. मतदानाची तारीख जशी जवळ येऊ लागली तशी प्रचार यंत्रणेने जोर धरला आहे. पक्ष पातळीवर, उमेदवारांकडून मोठ्या प्रचार सभांचे आयोजन केले जाते. राज्यात अनेक ठिकाणी एक दिवसात दहा दहा सभा, बाईक रॅली, पदयात्रा आदींचे आयोजन होते. या सर्व ठिकाणी लोकांची झालेली गर्दी ही त्या उमेदवाराची ताकद दाखवणारी ठरते. याचा इतर मतदारांवर मोठा प्रभाव पडतो असा गोड गैर समज असू ही शकतो. पण खरोखरच या सभांना पदयात्रा, रॅली याला उपस्थित असलेले सर्व जण स्वखुशीने येतात का हा संशोधनाचा विषय आहे.         या प्रचार सभांना झालेल्या गर्दीतील अनेकांना व्यासपीठावरून मोठमोठी भाषणे ठोकणाऱ्यांमध्ये काहीच रस दिसून येत नाही. त्यांना केवळ आपल्याकडील स्लिप वर ( त्या कार्यक्रमाला येण्यासाठी व शेवटपर्यंत होतो/होती, हे दाखविण्यासाठी) एखाद्या प्रमुख कार्यकर्त्यांची किंबहुना यासाठी नियुक्त असल्याची सही कधी मिळते यासाठी धडपड दिसून येते. कारण या स्लिपवर सही मिळाली तरच त्याला नंतर अमुक एक ठिकाणी ठरवून दिलेले पैसे मिळणार असतात. हा प्रकार लपून झाला पाहिजे याची काळजी प्रमुख कार्यकर्ते घेतात. पण ज्याला स्लिप मिळाली आहे व सभा स्थानी हजेरी झाली की घरी जाण्याची घाई आहे. असा उपस्थित ( तो मतदार असेल असे नाही) व्यक्ती आपली ही सहीची व्याकूळता लपवू शकत नाही. त्यामुळेच असे प्रकार इतर सुजान मतदारांच्या लक्षात येतात. व त्या गर्दीचे बिंग फुटते. असो, सध्याच्या परिस्थितीत राजकीय पक्षांना, नेत्यांना कार्यकर्त्यांची फौज उभे करणे शक्य नसल्याने, आपल्यावरील प्रेम दाखविण्यासाठी अशा विकतच्या प्रेमाचा आधार घ्यावा लागत आहे.

आता भेळी चे दिवस गेले,गाडीचे पेट्रोल व रात्रीच्या पार्टीचे काय        आमचा माणूस मग तो कोणत्याही पक्षाचा असो. तो निवडणुकीत उभा राहिला की, त्याचे कार्यकर्ते तन मन धनाने त्याचे मागे उभे राहत. ऊन वारा पाऊस न पाहता केवळ एक वेळच्या सामूहिक भेळीच्या मैफलीत आपला थकवा घालवत. पण काळ बदलला व भेळी च्या मैफली चे ते दिवस सरले अन गाडीचे पेट्रोल व रात्रीच्या पार्टीचे काय असा प्रश्न आहे ते व येणारे कार्यकर्ते विचारात आहेत. आपला नेता उद्या आहे त्याच पक्षात राहील की पक्ष बदल करेल याची कुठलीही शाश्वती राहिली नाही. त्यांच्यासाठी जीवाचे रान करायचे व त्यांनीच आपल्याला आधांतरी सोडायचे हे प्रकार गेल्या काही वर्षात राज्यात अनेक ठिकाणी घडले आहेत. सोशल मीडियावर ही याबाबत चांगल्याच रील वेगवेगळ्या प्रकारे फिरत आहेत.         सर्वच कार्यकर्ते एक समान आहेत असे नाही काही उमेदवाराचे, ( नेत्यांचे) पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आजही आहेत पण ते मोजकेच. तुम्ही आमच्याकडे येणार तेही निवडणुकीपूरतेच तर याना का सोडायचे. असा पवित्रा अनेकांनी घेतला आहे. याचा चांगला अनुभव महापालिका सभागृहाची मुदत समपल्यावर आला होता. आता निवडणूक होणार म्हणून अनेकांनी कार्यकर्त्यांसाठी सहली, त्याचा खर्च, जेवणाच्या पंगती उठल्या. पण झाले उलटेच निवडणुका लांबल्या. हे हात आखडले गेले. अनेकांची सम्पर्क कार्यालये बंद झाली. काही नेते भेटेनासे झाले. पण आता हेच नेते लोकसभेच्या निमित्ताने पुढे आले आहेत. भविष्यातील महापालिका व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांना आपलेसे करत आहेत.

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणMONEYपैसाVotingमतदानElectionनिवडणूक