वाघोली : कोव्हॅक्सिन या लसीच्या उत्पादनासाठी न्यायालयाने पुण्याजवळील मांजरी येथील बायोवेट या कंपनीच्या प्रकल्पाला दिली असून, या प्रकल्पाला पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख आज भेट देणार आहेत. येथे लवकर कोव्हॅक्सिन लसीची उत्पादन प्रकल्प युद्धपातळीवर सुरू करण्यासाठी शासकीय स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत.
कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन महाराष्ट्रात लवकरच वाढणार आहे. भारत बायोटेकची सहाय्यक कंपनी असलेल्या बायोवेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला पुण्यात कोव्हॅक्सिन लसीच्या उत्पादनासाठी १२ हेक्टरचा भूखंड देण्यास हायकोर्टाने परवानगी दिली आहे.
मांजरी खुर्द (ता. हवेली) येथील भूखंड परदेशातील इंटरवेट इंडिया या कंपनीला पायावर व तोंडाच्या विकारांवर लस निर्माण करत असे. राज्यात कोरोनाची स्थिती गभीर अजून लसीकरणाचा वेग कमी असल्याने लसीचा तुटवडा जाणवत आहे. पुण्यातील मांजरी बुद्रूक येथील ‘सिरम’च्या कंपनीकडून कोव्हिशिल्ड लसीचे उत्पादन केले जाते. लवकरच कोव्हॅक्सिन लसही पुण्यातील मांजरी खुर्द येथे तयार केली जाणार आहे.
या कंपनीतील स्टोरेज रूम, पाणी फिल्टर प्लांट, विद्युत सप्लाय, डेव्हलपमेंट कोल्ड रूम, जनसेट विद्युत सप्लाय, डिझेल टँक, ऑईल टँक, डेव्हलपमेंट फॅसिलिटी रूम, सुरक्षा आणि स्थानिक कर्मचारी तसेच कंपनी व्यवस्थापनाची माहिती घेण्यात येणार आहे. त्यामुळे आता लवकरच कोव्हॅक्सिन लसीचेही उत्पादन पुण्यात सुरू होण्यासाठी हालचालींचा शासकीय स्तरांवर वेग वाढला आहे.
चौकट
भारत बायोटेक कंपनीच्या प्लांटला पुण्यात जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पुणे जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. हा प्रकल्प लवकर सुरू होणार असून त्यानुसार नियोजन सुरू आहे. ते कामही तातडीने मार्गी लागेल, असे देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितले.
(फोटो आहे : ११वाघोली बायोटेक)