पुणे : सद्यस्थितीत देशात मोठ्या प्रमाणावर कुशल मनुष्यबळ निर्माण होणे गरजेचे आहे. मात्र, आपण पारंपरिक शिक्षणात अडकून पडलो असून दहावी, बारावी, पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण व्यवस्थेमुळे आपली महाविद्यालये ही केवळ उच्च शिक्षण देऊन बेरोजगारांची निर्मिती करणारी कारखाने झाली आहेत. त्यामुळे नागरिकांनी आपल्या मानसिकतेत बदल करून कौशल्य विकासाला हातभार लावला पाहिजे, असे मत शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रविवारी व्यक्त केले.‘महाराष्ट्र स्टेट इन्स्टिट्यूट आॅफ हॉटेल मॅनेजमेंट अॅन्ड केटरिंग टेक्नॉलॉजी’च्या नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी तावडे बोलत होते. याप्रसंगी राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ. धनराज माने, तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ, महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाचे संचालक डॉ. विनोद मोहितकर, डीटीईचे पुणे विभागीय सहसंचालक डॉ. दिलीप नंदनवार, प्राचार्या अनिता मुदलियार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेश पांडे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना तावडे म्हणाले, खेळायला मैदान नसल्याचे तक्रार एका विद्यार्थ्याने केली त्यावर तत्काळ शासकीय पॉलिटेक्निकचे मैदान उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले.
महाविद्यालये बेरोजगारांची निर्मिती करणारे कारखाने : तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 1:46 AM