शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्री होताच हेमंत सोरेन यांचा मोठा निर्णय, 'मैया सन्मान योजने'संदर्भात मोठी घोषणा
2
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
3
PM Modi Salary: पंतप्रधान मोदींना दर महिन्याला सत्कार भत्ता म्हणून मिळतात केवळ 3000 रुपये, जाणूनघ्या किती आहे सॅलरी?
4
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
5
इस्रायलनं काही तासांतच केलं युद्धविरामाचं उल्लंघन? लेबनानमध्ये हिजबुल्लाहच्या ठिकाणावर केला मोठा हवाई हल्ला
6
Killer Cat: पाळलेल्या मांजरीच्या हल्ल्यात एकाचा मृत्यू; पत्नी म्हणते...
7
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
8
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
9
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
10
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
11
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
12
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
13
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
14
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
15
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
16
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
17
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
18
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
19
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
20
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."

मुकाबला ‘टपोरी’ डॉनशी - अग्रलेख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 4:09 AM

डॉनचे नाव घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी डॉनची आक्रमकता आत्मसात केली. म्हणूनच सातत्याने ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करू ...

डॉनचे नाव घेणाऱ्या ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनी डॉनची आक्रमकता आत्मसात केली. म्हणूनच सातत्याने ऑस्ट्रेलियाचा संघ जागतिक क्रिकेटमध्ये स्वत:चा दबदबा निर्माण करू शकला. लढवय्ये, जिंकण्यासाठी अखेरपर्यंत बाजी लावणारे ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटची खासीयत आहे. पण, त्यात डॉनची सभ्यता नाही. डॉननंतरची ऑस्ट्रेलियन आक्रमकता म्हणजे शेरेबाजी, चिडखोरपणा, प्रतिस्पर्ध्याबद्दलचा अनादर आणि जिंकण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची वृत्ती असेच समीकरण बनले आहे. अपवाद अगदी हाताच्या बोटावर मोजता येईल अशा खेळाडूंचा. त्यामुळे ऑस्ट्रेलियन क्रिकेट म्हणजे गावंंढळ, टपोऱ्या डॉनची कहाणी बनून राहिले आहे.

येत्या शुक्रवारी ब्रिस्बेनच्या मैदानात भारताचे वाघ पुन्हा एकदा ऑस्ट्रेलियन कांगारूंशी भिडतील. बॉर्डर-गावस्कर कसोटी क्रिकेट मालिकेतला हा चौथा आणि अंतिम सामना केवळ मालिकेचे जेतेपद निश्चित करण्यापुरता मर्यादित उरलेला नाही. या मालिकेतील पहिल्या तीन सामन्यांमधल्या टोकदार संघर्षाचे पडसाद या सामन्यावर आहेत. हा संघर्ष मैदानी मुकाबल्याचा नाही. भारतीय खेळाडूंना वंशद्वेषाचा, वर्णभेदी शेऱ्यांचा सामना करावा लागला आहे. चेंडूच्या आकारात फेरफार केल्याप्रकरणी स्टीव्ह स्मिथला यापूर्वीच शिक्षा झालेली आहे, तरी स्वभावात बदल शून्य. ऋषभ पंतची लय बिघडवण्यासाठी या महाशयांनी त्याच्या ‘बॅटिंग गार्ड’ची खूण मिटवण्याचा प्रयत्न केला. कर्णधार टीम पेनने स्वत: तीन झेल सोडले, पण तरीही सातव्या क्रमाकांच्या फलंदाजालाही शेरेबाजी करण्याची किडकी वृत्ती त्याने दाखवली. अंगावर धावून जाणारे गोलंदाज तर नेहमीचेच. हे कमी की काय म्हणून भारतीय क्षेत्ररक्षकांनाही प्रेक्षकांमधून वर्णद्वेषी शेरे ऐकवले गेले. खेळाडू म्हणून पराभूत होणारे ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू माणूस म्हणूनही अपयशी ठरले आहेत.

या पार्श्वभूमीवर ऑस्ट्रेलियाला शेवटचा धक्का देण्याच्या तयारीत भारत असेल. पहिला सामना ज्या झोकात यजमानांनी जिंकला तो तोरा पुढच्या दोन्ही सामन्यांत भारताने उतरवला. विशेष म्हणजे, कोण्या एकाच्या कामगिरीवर नव्हे तर सांघिक प्रदर्शनाच्या बळावर. ऑस्ट्रेलियासाठी हीच मोठी आव्हानात्मक स्थिती आहे. कर्णधार विराट कोहलीने बापपणाच्या रजेसाठी माघार घेतली. पाठोपाठ मोहम्मद शमी, उमेश यादव, के. एल. राहुल, रवींद्र जडेजा अशी फळीच जखमी झाली. पण, यामुळे भारतीय संघाची बेडर वृत्ती आणि बलदंड मन जराही उणावले नाही. जितके मोठे आव्हान तितकी जबरदस्त कामगिरी असेच गेल्या दोन कसोटी सामन्यांचे विश्लेषण करावे लागते. हनुमा विहारी, आर. आश्विन, ऋषभ पंत या त्रयीने दाखवलेली जिगर, चेतेश्वर पुजाराची अखंड साधना यांनी ऑस्ट्रेलियन उद्धटपणाचा पालापाचोळा केला. कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेचा धीरोदात्तपणा ऑस्ट्रेलियाच्या अनाठायी आक्रमकतेपुढे अधिक उंच झाला. मितभाषी अजिंक्यही दोन सामन्यांतच 'डॉन' झाला. पण ते मैदानातल्या कामगिरीवर, अनावश्यक बडबड करून नाही. मालिकेपूर्वी ‘चार-शून्य’च्या गमजा मारणाऱ्या ऑस्ट्रेलियाला अजिंक्यने पाठ टेकायला लावली असली, तरी जखमी खेळाडूंच्या वाढत्या यादीमुळे अजिंक्यसाठी ‘लास्ट लाफ’ अधिक आव्हानात्मक ठरला आहे. हे हास्य अजिंक्यने मिळवले तर ऑस्ट्रेलिया नामक टपोरी ‘डॉन’ची पुरती फजिती निश्चित आहे.