--------------
ओतूर : जुन्नर तालुक्यातील ओतूर-ओझरमार्गे नारायणगाव या मार्गावर हिवरे खुर्द हे गाव आहे. या गावातील शेतकऱ्याचा मुलाने मॅकेनिकल बी.ई ही पदवी घेऊन भंगारात मिळणाऱ्या साहित्यातून इलेक्ट्रिक पॉवर व सोलरवर चालणारी काँबो कार बनविली आहे. ईश्वर वायकर असे या तरुणाचे नाव आहे.
ईश्वरचे शालेय व कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षण ओतूर व परिसरात झाले. त्यानंतर त्याने काॅलेज आॅफ इंजिनिअरिंग, कुरण (नारायणगाव-जुन्नर) येथे पूर्ण करुन मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली. पदविका अभ्यासक्रम पूर्ण करत असताना तेथे सोलर कार हा वेगळा प्रोजेक्ट त्याने बनविला होता. नंतर बी.ई. मॅकेनिकल डिग्रीसाठी वनसिट हेलिकॉप्टर असाही वेगळा प्रोजेक्ट त्याने बनविला होता. दोन्ही प्रोजेक्टमध्ये यश मिळाल्यावर त्याचा आत्मविश्वास वाढला. मुंबईतील होंडा सिटी, पुण्यातील टोयाटो आणि नारायणगाव येथील मारुती सुझुकी शोरुममध्ये त्याने चार-पाच वर्षे काम करण्याचा अनुभव घेतला व त्यानंतर "काॅम्बोकार" बनविण्यासाठी प्रारंभ केला.
ही कार बनविण्यासाठी ७०% टाकाऊ वस्तू किंवा भंगार म्हणून टाकलेल्या त्याला हव्या असणाऱ्या वस्तू विकत घेऊन त्याद्वारे ही कार बनविली. त्यासाठी दोन ४८ व्हॅट, ३० ए.एच लिथियम बॅटरी त्याने वापरली आहे. १२५ वॅटचे ३ सोलर पॅनेल वापरले आहेत. कार बनविण्यासाठी १ लाख ४० हजार रुपये खर्च आला.
ही कार सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर अनेक जणांनी कार पाहण्यासाठी भेट दिली. कारचे उद्घाटन ओतूर पिंपरी पेंढार गटाचे जि. प. सदस्य मोहित ढमाले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून सोशल डिस्टन्सचे पालन करून झाले. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दखल घेतली आहे. तेही भेट देणार आहेत.
---
कारची वैशिष्ट्ये
कारची वजनक्षमता १५० ते २०० किलो आहे. बॅटरी ३ तासांत चार्ज होते. लाईटवर ४० किलोमीटर चालते. रात्री ४ कि.मी. चालते. कारचा तासी वेग ४५ ते ५५ किमी आहे. सोलर बंद झाल्यावर बॅटरीवर कार चालते व पुन्हा सोलरवर चालू शकते. सध्या डिझेल पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. दुचाकीचालक किंवा डिझेल पेट्रोल वापरणाऱ्यांना ही कार उपयुक्त ठरेल. शेतातील मालवाहतूक करणारा उपयुक्त ठरेल.
सध्या बॅटरी चार्जसाठी ३ तास लागतात. ती कमी वेळेत कशी चार्ज होईल. त्यासाठी ते प्रयत्न करीत आहेत. ग्रामीण भागासाठी मालवाहतूक व शेतकऱ्यांना उपयुक्त ठरेल या हेतू ठेवून काॅम्बोकार बनवली आहे.
---
फोटो क्रमांक : १६ ओतूर ईकार
फोटो क्रमांक : काॅम्बोकार वर्कशॉप इंजिनिअर ईश्वर वायकर.