आ. सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून क्लीन चिट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 11:56 AM2024-06-02T11:56:43+5:302024-06-02T11:56:58+5:30

आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. अशा घटना घडल्यानंतर तिथे जाणे हा त्याच्या कामाचाच भाग आहे, असेही ते म्हणाले.

come Clean chit to Sunil Tingre from Ajit Pawar | आ. सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून क्लीन चिट

आ. सुनील टिंगरेंना अजित पवारांकडून क्लीन चिट

पुणे : पोर्शे कार अपघातात आमदार सुनील टिंगरे यांनी काहीही केलेले नाही. जो काही चुकीचा तपास झाला तो अधिकाऱ्यांनी केला असून, त्यांच्यावर कारवाई होत आहे, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आ. टिंगरे यांची पाठराखण केली. आमदार हा लोकप्रतिनिधी असतो. अशा घटना घडल्यानंतर तिथे जाणे हा त्याच्या कामाचाच भाग आहे, असेही ते म्हणाले.

एका कार्यक्रमानिमित्त शनिवारी सकाळी अजित पवार पुण्यात आले होते. पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, की सरकारने हा अपघात व त्याचा तपास गंभीरपणे घेतला आहे. तसे नसते तर दुसऱ्याच दिवशी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले नसते. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ परदेशात होते. तिथून आल्यावर त्यांनी लगेच वैद्यकीय अधिकाऱ्यांवर कारवाई केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या तपासावर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे यात राजकीय हस्तक्षेप होतो आहे, या म्हणण्यात तथ्य नाही, असेही अजित पवार म्हणाले.

पोलिस आयुक्तांना फोन केला नाही 
अपघात झाल्यानंतर मी पोलिस आयुक्तांना फोन केलेला नाही. ते कुठे होते, मी कुठे होतो कोणाला माहिती नाही आणि लगेचच मी फोन केला असे म्हटले जाते. केला असता तरीही योग्य पद्धतीने तपास करा, कोणाचीही गय करू नका, असेच सांगितले असते, असे अजित पवार म्हणाले. 

शिफारस प्रकरणीही अधिकारी जबाबदार
डॉ. तावरे यांची शिफारस टिंगरे यांनीच केली होती, असे लक्षात आणून दिल्यानंतर पवार म्हणाले, आमदार त्यांची कोरी लेटरहेड्स स्वीय सहायकाकडे ठेवून देतात. त्यावर स्वाक्षरी केलेली असते. हे चूक आहे. 
मात्र, तसे केले जाते, मी स्वत:ही अशी लेटरहेड्स ठेवली आहेत. आम्ही  बदली, बढतीसाठी शिफारस करतो, ते योग्य आहे किंवा नाही, हे पाहण्याची जबाबदारी वरिष्ठ अधिकाऱ्यांची असते, असे सांगत अजित पवार यांनी शिफारशीचाही दावा 
खोडून काढला.

Web Title: come Clean chit to Sunil Tingre from Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.