लोकमत न्यूज नेटवर्क
रांजणगाव गणपती : रक्तदान व प्लाझ्मा दान ही आजच्या कोविडच्या काळातील अत्यावश्यक गरज आहे. त्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे, असे आवाहन शिरूर पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाचुंकर यांनी केले.
कोंढापुरी (ता. शिरूर) येथे माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अक्षय ब्लड बँक हडपसर यांच्या वतीने रक्तदान व प्लाझ्मादान शिबिरात ते बोलत होते. यावेळी एकूण १०३ जणांनी रक्तदान तर ९ जणांनी प्लाझ्मादान केले. या रक्तदान, प्लाझ्मादान शिबिराचे उद्घाटन शिरूर पंचायत समितीचे सदस्य विक्रम पाचुंदकर व राजमुद्रा पतसंस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाचुंदकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कोंढापुरी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य आशिष गायकवाड, पोलीस पाटील राजेश गायकवाड, सविता गायकवाड, ग्रामपंचायत सदस्या धनश्री ठोंबरे, ग्रामपंचायत माजी सदस्या मंदाकिनी गायकवाड, डॉ. अभिजित अहिर, प्रशांत शिगवण, अक्षय चौधरी, हृषीकेश साळुंखे, गौरव कदम, प्रज्वल गवळी तसेच आशिष गायकवाड विचार मंचाचे असंख्य कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. वाढदिवसाचे औचित्य साधून कोंढापुरी येथील कोविड सेंटरला आशिष गायकवाड विचार मंचाच्या वतीने रुग्णांना केळी व बिस्कीट पुड्यांचे वाटप करण्यात आल्याचे हृषीकेश गायकवाड यांनी सांगितले. कुणाल गायकवाड, रूपेश ढमढेरे, रमेश गायकवाड, दीपक गायकवाड, प्रमोद गायकवाड, अतुल गायकवाड, नितीन गायकवाड, प्रतीक गायकवाड, वैभव गायकवाड, अजित गायकवाड, रामहरी गायकवाड, संकेत डोमाळे, निखिल गायकवाड, गणेश लवांडे, संग्राम मेकरे, संदेश ढाकणे, आकाश गायकवाड, श्याम ठोंबरे, विक्रम ठोंबरे, शांताराम गायकवाड या कार्यकर्त्यांनी शिबिर यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.
फोटो: कोंढापुरी येथे रक्तदान व प्लाझ्मा दान शिबिराचे उदघाटन करताना.