वाघोली: शिरुर लोकसभेचे खासदार डाॕ.अमोल कोल्हे यांनी पूर्व हवेली व वाघोली परिसराला कोविड सेंटर व लसीकरण केंद्रांना भेट देत पाहणी केली करून लसीकरण बाबतीत आढावा घेतला. पूर्व हवेली तालुक्यात व वाघोली परिसरात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असल्याने कोविड आटोक्यात आणण्यासाठी त्याबाबतच्या उपाययोजनांबाबत आढावा घेतला. तसेच कोल्हे यांनी संबधित विभागाच्या अधिकारी वर्गाला सुुुचना केल्या.
पूर्व हवेलीतील वाढती कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी उपाययोजना करणे व लसीकरणावर अधिक भर देणार असल्याचे कोल्हे यांनी सांगितले. लस कमी प्रमाणात मिळत असल्याच्या अनेकांनी तक्रारी केल्या असून त्या मला मिळाल्या आहे. वाघोलीसह इतर ठिकाणी अधिक लसींचे डोस उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आहे. राज्यातील मित्र पक्षाला लसीकरणावरुन राजकारण न करता लोकांचे जीव वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याचा सल्ला देत आहे. जे हॉस्पिटल कोविड रुग्णाची लूट करतील त्यांचे ऑडिट करून दोषींवर कारवाई करण्यासाठी भाग पडणार आहे.
यावेळी खास करून वाघोलीचे माजी उपसरपंच राजेंद्र सातव पाटील यांनी दहा लाख रुपयांची कोविडसाठी मदत करणार असल्याचे पत्र खासदार कोल्हे यांना दिले. कोल्हे यांनी राज्यातील दानशूर व्यक्तिंनी पुढे येऊन कोविड रुग्णांना मदत करावी असे बोलून त्यांचे आभार मानले.
या प्रसंगी हवेलीचे गटविकास अधिकारी प्रशांत शिर्के,तहसीलदार विजयकुमार चोबे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सचिन खरात,वर्षा राष्ट्रवादी चे तालुका अध्यक्ष दिलीप वाल्हेकर ,सरपंच वसुंधरा उबाळे, रामदास दाभाडे, राजेंद्र सातव पाटील,बाळासाहेब सातव,गणेश सातव,सुधीर भाडळे, इतर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.