पुणे : शहरात बुधवारी ३ हजार ३०३ कोरोनामुक्त झाले असून, नव्याने ३ हजार २६० कोरोनाबाधितांची वाढ झाली आहे़ आज दिवसभरात १९ हजार ७९० जणांच्या तपासण्या करण्यात आल्या आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १६़४७ टक्के इतकी आहे़
आज दिवसभरात शहरात ८३ जणांचा मृत्यू झाला आहे. यापैकी १९ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १़ ६३ टक्के आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार : शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६३४ कोरोनाबाधित रूग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ४१५ रुग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आत्तापर्यंत २२ लाख १० हजार २३८ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली असून, यापैकी ४ लाख ३६ हजार ३४९ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ तर यापैकी ३ लाख ८९ हजार ४९९ कोरोनामुक्त झाले आहेत़ तर आतापर्यंत शहरात ७ हजार ११८ जणांचा मृत्यू झाला आहे़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही ३९ हजार ७३२ इतकी आहे़