पुणे : शहरात बुधवारी १ हजार ९३१ कोरोनाबाधितांची वाढ झाली असून, त्यातुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या ही ४ हजार ५६७ जण कोरोनामुक्त झाले आहेत़ शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही २७ हजार १४ वर आली आहे़
आज दिवसभरात १३ हजार ९८१ जणांच्या तपासण्या केल्या आहे. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी १३.८१ टक्के इतकी आहे़ तर दिवसभरात शहरात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २४ जण हे पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६६ टक्के आहे़
पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ५०७ कोरोनाबाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३९५ रुग्ण हे गंभीर आहेत़ शहरात आतापर्यंत २३ लाख १३ हजार ५६४ जणांची कोरोना तपासणी केली आहे. यापैकी ४ लाख ५२ हजार ६४ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत़ यापैकी ४ लाख १७ हजार ५३७ कोरोनामुक्त झाले आहेत़ आतापर्यंत शहरात ७ हजार ५१३ जणांचा मृत्यू झाला आहे़