लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या रविवारीही कायम आहे. आज दिवसभरात ४ हजार ७५९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर तपासणी केलेल्या २० हजार ३४८ जणांपैकी ४ हजार ६३१ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तपासणीच्या तुलनेत कोरोनाबाधितांची टक्केवारी २२.७५ टक्के इतकी आहे. दरम्यान आज शहरातील कोरोनाबाधितांची संख्या चार लाखांच्या पुढे गेली आहे. ९ मार्च, २०२० पासून आजपर्यंत शहरात ४ लाख ११७ जण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.
दिवसभरात ७६ जणांचा मृत्यू झाला असून, यापैकी २१ जण पुण्याबाहेरील आहेत़ शहरातील आजचा मृत्यूदर हा १.६२ टक्के इतका आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, शहरातील विविध रुग्णालयांमध्ये सध्या ६ हजार ६१९ बाधित रुग्ण हे ऑक्सिजनसह उपचार घेत असून, १ हजार ३६९ रुग्ण हे गंभीर आहेत. शहरात आत्तापर्यंत २० लाख ३४ हजार ५१ जणांची कोरोना तपासणी केली असून, यापैकी ४ लाख ११७ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर यापैकी ३ लाख ४४ हजार ३३० कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णसंख्या ही सद्यस्थितीला ५९ हजार २८९ इतकी झाली आहे़