लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : जिल्ह्यातील ग्रामीण क्षेत्रात कोरोना संसर्ग कमी झाला असला तरी तो समाधानकारक नाही. या आठवड्यात हॉटस्पॉट गावांची संख्या शंभरीच्या आत आली असून, चार तालुके खेड, भोर, वेल्हा आणि मावळ हे "हॉटस्पॉटमुक्त' झाले आहेत, तर मुळशी तालुक्यात एकच गाव "हॉटस्पॉट'. त्यामुळे या तालुक्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
ज्या गावात दहापेक्षा जास्त कोरोनाबाधित संख्या आहे, ते गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर कले जाते. आतापर्यंत ग्रामीणमध्ये ९१ गावे हॉटस्पॉट आहेत. त्यामध्ये जुन्नर तालुक्यात सर्वाधिक २५ गावांचा समावेश आहे. इंदापूर, आंबेगाव तालुक्यात प्रत्येकी १२ तर बारामती तालुक्यात १५ हॉटस्पॉट गावे आहेत. दरम्यान, दि. २८ एप्रिल रोजी ग्रामीणमधील सर्वाधिक ४६५ हॉटस्पॉट गावे होती. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून ग्रामीण भागातील बाधित संख्या कमी होत असल्यामुळे दि. १९ मे रोजी ही हॉटस्पॉट संख्या ३९७ पर्यंत खाली आली. तर, २ जून रोजी ती संख्या १८६ इतकी होती. दि. ९ जून रोजी जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात आठ दिवसात १०० ने हॉटस्पॉट गावांची संख्या कमी झाल्याचे सांगण्यात आले. त्या वेळी हॉटस्पॉट संख्या ८६ इतकी होती. त्यामुळे महिनाभरात ही संख्या आणखीन कमी होईल, या आशेने आरोग्य विभागही निवांत झाले. मात्र, मागील दोन महिन्यांपासून हॉटस्पॉट संख्या कमी होण्याएवजी ती वाढतच आहे.
चौकट
तालुकानिहाय हॉटस्पॉट गावांची संख्या
इंदापूर - १२, आंबेगाव - १२, पुरंदर - ३, बारामती - १५, जुन्नर - २५, शिरूर - ७, हवेली - ६, दौंड - १०, खेड - ०, भोर - ०, मुळशी - १, मावळ - ०, वेल्हा - ०
चौकट
धडक सर्वेक्षणात ३ लाख ६८ हजार ७८९ जणांची तपासणी
जिल्ह्यात १३ जुलै ते १ सप्टेंबर दरम्यान धडक सर्वेक्षण राबविण्यात आले. त्यात आतापर्यंत ३ लाख ६८ हजार ७८९ जणांची नमुना तपासणी करण्यात आली. आंबेगाव तालुक्यात २५ हजार ६३० (७ टक्के), बारामती ६६ हजार ८१२ (१८ टक्के), भोर २५ हजार ५३२ (६ टक्के), दाैंड १९ हजार ४९० (५टक्के), हवेली २७ हजार २५३ (७ टक्के), इंदापूर ३१ हजार ७३० (९ टक्के), जुन्नर ३३ हजार ३४७ (९ टक्के), खेड २५ हजार ९६५ (७ टक्के), मावळ ३८ हजार ३४९ (११ टक्के), मुळशी २२ हजार ६८० (६ टक्के), पुरंदर २० हजार ८२३ (६ टक्के), शिरूर ३० हजार २४७ (८ टक्के), वेल्हा ४ हजार ३ (१ टक्का).