शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

दिलासा : दीड महिन्यांनतर प्रथमच सर्वात कमी रुग्णसंख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:12 AM

पुणे : पुण्यासाठी शुक्रवारचा दिवस दिलाशाचा ठरला असून, दीड महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदविली गेली आहे. पुण्यामध्ये आज ...

पुणे : पुण्यासाठी शुक्रवारचा दिवस दिलाशाचा ठरला असून, दीड महिन्यानंतर प्रथमच सर्वात कमी रुग्णसंख्या नोंदविली गेली आहे. पुण्यामध्ये आज २४५१ नवे रुग्ण सापडले. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ३४९१ असून, नव्याने बाधितांपेक्षा एक हजाराने जास्त आहे. पुण्यामध्ये कोरोनाची दुसरी लाट १६ मार्चपासून सुरू झाली. एक ते ९ मार्चदरम्यान तीन आकडी असणारी रुग्णसंख्या १० मार्चपासून चार आकडी झाली. १५ मार्चनंतर रुग्णसंख्येने दोन हजारांचा आकडा ओलांडला. २३ मार्चनंतर दररोज तीन ते साडेतीन हजार रुग्ण सापडू लागले. २८ मार्चनंतर कोरोनाचा कहर वाढू लागला. दररोज चार हजार नवे रुग्ण आणि कोरोनामुक्त होणारे दोन हजारांच्या आसपासच असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली. ३ एप्रिलनंतर दैनंदिन रुग्णसंख्या पाच हजारांवर गेली. ८ एप्रिल रोजी सर्वाधिक सात हजार रुग्ण सापडले होते. संपूर्ण एप्रिल महिना रुग्णसंख्या साडेचार हजार ते सहा हजारांपर्यंत होती. मात्र, मेच्या पहिल्या आठवड्यात रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. बाधितांच्या प्रमाणात बरे होणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. १८ एप्रिलला ५६ हजारांवर गेलेली सक्रिय रुग्णसंख्या ७ मे रोजी सुमारे २० हजारांनी कमी होऊन ३८ हजार ४८१ झाली आहे.

नगर रोड- वडगाव शेरी, कोथरुड-बावधन वगळता

मे महिन्याचा पहिला आठवडा दिलासादायक

नगर रोड- वडगाव शेरी आणि कोथरुड-बावधन वगळता पुण्याच्या इतर भागांसाठी मे महिन्याचा पहिला आठवडा दिलासादायक ठरला आहे. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्या कमी झाली आहे.

प्रभाग २३ ते २८ एप्रिल २९ एप्रिल ते ५ मे

हडपसर- मुंढवा ४४७५ ३७०३

नगर रोड वडगावशेरी २८९७ ३०५२

सिंहगड रोड २७८१ २४३४

धनकवडी-सहकारनगर २५१७ २४०३

वारजे-कर्वेनगर २४८८ २३८५

कोथरुड-बावधन १९५६ २२५८

औंध-बाणेर २२५४ १८५१

येरवडा-कळस-धानोरी १५६९ १५०२

कोंढवा-येवलेवाडी १५५० १२३२

बिबवेवाडी ११८७ ११२६

ढोले पाटील रोड ८३६ ९२२

शिवाजीनगर-घोले रोड १०९१ ८७३

कसबा-विश्रामबागवाडा ९०३ ८६०

वानवडी-रामटेकडी १०२९ ८५२

भवानी पेठ ३९० ३९२