शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
3
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
4
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
5
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
6
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
7
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
9
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
10
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
11
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
12
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
13
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
14
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
15
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
16
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
17
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
18
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
20
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"

शिक्षकेतर कर्मचा-यांना दिलासा

By admin | Published: November 22, 2014 12:36 AM

खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतिबंधाच्या अंमलबजावणीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सुमारे ३० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला

लोणी भापकर : खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नवीन आकृतिबंधाच्या अंमलबजावणीस उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने सुमारे ३० हजार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तूर्त दिलासा मिळाला आहे. तर शासन निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे शाळांनी सर्वच कर्मचाऱ्यांचे पगार नियमित म्हणजे आॅनलाइन काढण्याच्या सूचना देण्याची मागणी राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी शिक्षण विभागाकडे केली आहे.राज्यातील मान्यताप्राप्त खासगी अनुदानित शाळांतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा संदर्भात राज्य शासनाने २३ आॅक्टोबर २०१३ रोजी सुधारित आकृतीबंध लागू केला आहे. त्यानुसार अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांतील प्रयोगशाळा परीचर व नाईक ही पदेच रद्द ठरविण्यात आली आहेत. याशिवाय शिपाईपदांची संख्याही घटविण्यात आली आहे. त्यामुळे राज्यभरातून सुमारे ३० हजार चतुर्थश्रेणी कर्मचारी अतिरिक्त ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सुधारित आकृतीबंधाच्या विरोधात राज्य शिक्षकेतर कर्मचारी संघटनेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करून नवा आकृतिबंधाच्या अंमलबजावणीस स्थगिती देण्याची विनंती मान्य केल्याचे शिक्षकेतर कर्मचारी महामंडळाचे सरकार्यवाह शिवाजी खांडेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवांसाठी चिपळूणकर समितीच्या शिफारशी लागू करण्यासाठी आम्ही वर्षानुवर्षे संघर्ष करीत आहोत. मात्र, राज्यशासनाने २५ नोव्हेंबर २००५ च्या निर्णयानुसार चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या भरतीवरच बंदी आणली. तर २३ आॅक्टोबर २०१३ च्या निर्णयानुसार शाळांतील प्रयोगशाळा परीचर व नाईक ही पदेच संपविली. यामुळे शाळा व्यवस्थापन गुणवत्तेवर विपरीत परीणाम होणार आहे. (वार्ताहर)