गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या विशेष प्रयत्नांतून पंचवीस पंधरा या योजनेअंतर्गत रस्त्याचे काम मंजूर झाले आहे. ग्रामपंचायत सदस्य पल्लवी थोरात-भक्ते यांनी या कामासाठी पाठपुरावा केला आहे. जिल्हा परिषद सदस्य अरुणा थोरात, उपसरपंच युवराज बाणखेले यांच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य पल्लवी संदीप थोरात, ज्योती थोरात, शरद सहकारी बँकेचे संचालक दत्ता थोरात, सोसायटीचे अध्यक्ष अरुण लोंढे, जे. के. थोरात, राष्ट्रवादीचे मंचर शहराध्यक्ष सुहास बाणखेले, प्रवीण मोरडे, रंगनाथ लोंढे, शिवाजी लोंढे, बाळासाहेब लोंढे आदी उपस्थित होते.
लक्ष्मण थोरात म्हणाले की, या भागातील विकासकामांना गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्या माध्यमातून जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून दिला जाईल. सर्वसामान्य नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहोत. अरुण लोंढे यांनी मनोगत व्यक्त केले.
२७मंचर
मंचर शहरातील प्रभाग क्रमांक पाचमधील रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.