साकुर्डे येथे डॉ. दुर्गाडे यांच्या हस्ते नाबार्ड अंतर्गत साकुडे ते पुणे- पंढरपूर महामार्ग जोडणाऱ्या रस्त्याच्या या टप्प्याच्या कामाचा शुभारंभ आज करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. या वेळी आ. संजय जगतापही उपस्थित होते. साकुर्डे ते साकुर्डे फाटा या दोन किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी नाबार्डमधून सुमारे एक कोटी ५१ लक्ष रुपयांचा निधी टाकण्यात आला आहे. यातून साडेसात मीटर रुंदीचा डांबरी मार्ग होणार आहे. दोन ठिकाणी पूल आणि गावांतर्गत काँक्रीट रस्ता तसेच आवश्यक तेथे संरक्षक कठडे केले जाणार आहे. भविष्यात साकुर्डे फाटा ते वाल्हे असा पर्यायी महत्त्वाचा मार्ग होत असल्याने गावाच्या विकासाला मोठी गती येऊ शकेल. ग्रामस्थांनी मात्र या कामासाठी ठेकेदाराला सहकार्य करावे, असे आवाहन आ. संजय जगताप यांनी केले आहे. या वेळी पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती नीलेश जगताप, ज्येष्ठ नेते सुरेश सस्ते, खरेदी विक्री संघाचे संचालक विक्रम सस्ते, सरपंच रमेश जाधव, ग्राम पंचायत सदस्य सचिन थोपटे, अजित जाधव राजेंद्र जाधव, श्रीकांत सस्ते, विजय पवार, माजी सरपंच रामचंद्र जाधव, मारुती सस्ते, राजेंद्र सस्ते तसेच अशोक बरकडे, सचिन टेकवडे, संभाजी काळाणे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता सुभाष चावरे आदी उपास्थित होते.स्वागत सरपंच रमेश जाधव यांनी केले, तर आभार ज्येष्ठ नेते सुरेश सस्ते यांनी मानले.
साकुर्डे गाव ते फाटा रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करताना आ. संजय जगताप, डॉ. दिगंबर दुर्गाडे व इतर.