आंबाडखिंड घाट रस्ता परिसरात दर वर्षी मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो. पावासाळ्यात दरडी पडणे, दगड माती वाहून रस्त्यावर येणे यांसारखे प्रकार वारंवार घडतात. सदरचा रस्ता वाई, पाचगणी, महाबळेश्वरला जोडणारा जवळचा मार्ग असल्याने घाटातून वाहतूक नेहमीच सुरू असते. माॅन्सून सुरू झाल्याने पुढील दिवसांमध्ये पाऊस जोरदार झाल्यास घाटात वाहतुकीला अडथळा होऊ नये, तसेच अपघात घडू नये म्हणून पावसामुळे रस्त्यावर आलेला राडारोडा व गटारांमधील दगड-माती बाजूला काढून साफसफाई केली. छोट्या-मोठ्या दरडी व घाट रस्त्याची गटारे साफ केल्यामुळे पुढील काळात वाहतूक सुरळीत होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता योगेश मेटेकर यांनी सांगितले.
२३ भोर
आंबाडखिंड घाट रस्त्यावरील राडारोडा बाजूला करण्याचे सुरू असलेले काम.