मसिक पाळी दरम्यान महिलांना अनेक त्रासांचा सामना करावा लागतो. कधी जास्त प्रमाणात होणारा रक्तस्राव तर कधी होणारी कंबर किंवा अंगदुखी. पण वर्किंग वुमन्सना पाळीच्या काळात आराम करायचा तर थेट सुट्टीच घ्यायची वेळ येते.
काही खासगी कंपन्यांनी आता 'पीरियड लिव्ह'ला सुरुवात केली आहे. मात्र हा ट्रेंड सगळी कडे रुजायला वेळ लागणार आहे. त्यातच हा बदल सरकारी पातळींवर होणे आणखी अवघड आहे.
पण पुणे जिल्हा परिषद मात्र याला अपवाद ठरली आहे. महिला कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक पाउल पुढे टाकत पीरियड फ्रेंडली कक्षाची स्थापना केली आहे. या कक्षात आराम करण्याची सोय असणार आहेत. यासोबतच सॅनिटरी नॅपकिनची सोय, तसेच शेकण्यासाठा पिशवी अशा अनेक सोयी उपलब्ध असणार आहेत.
कोट
महिलांसाठी कामासाठी सुरक्षित वातावरण व्हावे यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच भाग म्हणून पुण्यात हे केंद्र सुरू केले आहे. या ठिकाणी महिलांना आराम तसेच काम करण्याची सुविधा असेल. त्या बरोबरच चॅाकलेट वगैरे सुविधादेखील पुरवल्या जातील. महिला कर्मचाऱ्यांची संख्या अधिक असल्याने त्यांना सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत.
यापुढील काळात पंचायत समितीमध्ये देखील अशी केंद्र सुरु केली जाणार आहेत.
- आयुष प्रसाद, मुख्यकार्यकारी अधिकारी