शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन भारतात पैसा गुंतवतात; मुकेश अंबानींनी अमेरिकेत केलं मोठं डील
2
“आधी CM राज्यात ठरायचा आता दिल्लीत निर्णय होतो, अजितदादांनी वेगळा अनुभव घ्यावा”: काँग्रेस
3
विराट कोहली सोबत World Cup ची ट्रॉफी उंचावणाऱ्या भारतीय खेळाडूचा क्रिकेटला रामराम
4
शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणाविरोधात मशीद समितीची सर्वोच्च न्यायालयात धाव; उद्या सुनावणी
5
"घुमटात मंदिराचे अवशेष..., तळघरात आजही गर्भगृह विद्यमान"; अजमेर शरीफ दर्ग्यासंदर्भात हिंदू सेनेनं केले आहेत मोठे दावे
6
कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाईंचा ND स्टुडिओ आता 'गोरेगाव फिल्मसिटी'च्या ताब्यात!
7
“भाजपा नेहमीच नवीन नेतृत्वाचा शोध घेत असते, राजस्थान-मध्य प्रदेशप्रमाणे...”: चंद्रकांत पाटील
8
"शिंदेनी मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडलेला नाही", उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण 
9
बाईकची टाकी फुल ठेवा, जास्त मायलेज मिळवा...! खरोखरच असे होते? तुम्हीही १००-२०० चेच भरता का...
10
IND vs PAK: भारताचा १३ वर्षीय वैभव सूर्यवंशी आता पाकिस्तानला चोपणार, सामना कधी?
11
पत्रकारानं थेट प्रश्न विचारला, अजित दादांनी मिश्किल उत्तर दिलं; म्हणाले, "मी काही ज्योतिष नाही..."! नेमकं काय घढलं?
12
मोठा दावा! एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री पदही स्वीकारणार नाहीत; शिंदे गटातून कोण होणार नेता...
13
बांगलादेशात 'इस्कॉन'च्या चिन्मय कृष्ण दास यांना अटक, शेख हसिना यूनुस सरकाविरोधात आक्रमक
14
भारतातील मोबाईल, फोन नंबर +91 ने का सुरु होतात? कोणी दिला हा नंबर...
15
... तर राजकारणातून निवृत्ती घेईन, शहाजीबापू पाटील यांचे मोठे विधान
16
७.८३ टक्के मतं कशी वाढली? नाना पटोलेंच्या आरोपांवर निवडणूक आयोग म्हणतं, "हे सामान्य आहे कारण..."
17
EVM वर पराभवाचे खापर, धनजंय मुंडेंचे काँग्रेसला खुले आव्हान; म्हणाले, “मान्य करा की...”
18
मृत्यूच्या १५ मिनिटं आधी सृष्टी आई, मावशीशी आनंदाने बोलली अन्...; कुटुंबीयांचा गंभीर आरोप
19
अजित पवारांची राष्ट्रवादी मोठा विस्तार करणार, दिल्लीतही निवडणूक लढणार; प्रफुल्ल पटेलांची मोठी घोषणा
20
SA vs SL Test : श्रीलंकेचा संघ ४२ धावांत All Out! ६४ ओव्हर्समध्ये पडल्या २० विकेट्स

बांधकाम साहित्याचे दर वाढल्याने व्यावसायिक व नागरिक अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 4:14 AM

पूर्व हवेलीतील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन ही गावे पुणे शहराच्या लगतच्या परिसरातील ...

पूर्व हवेलीतील अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. कदमवाकवस्ती, लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन ही गावे पुणे शहराच्या लगतच्या परिसरातील असल्याने या ठिकाणी व्यवसाय व नोकरीनिमित्त आलेल्यांनी गुंठे घेऊन स्वतःची घरे बनवण्याची स्वप्ने या लॉकडाऊनमुळे तुटली आहेत. त्यातच घरांच्या बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्यांचे दरही गगनाला भिडल्याने आता घराचे बांधकाम करणेही महाग झाले आहे.

वाळू, वीट, स्टील व सिमेंट यांच्या दरांमध्ये लॉकडाउनच्या नंतर जवळपास २० ते ४० टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. यामुळे नव्याने घराचे बांधकाम करणाऱ्या नागरिकांना या महागाईला सामोरे जावे लागत आहे. काही ठिकाणी बांधकाम साहित्याचे दर वाढल्यामुळे व्यापाऱ्यांनी मर्यादित साहित्याचा साठा करून ठेवला आहे. त्यात लॉकडाउनच्या काळात वाहतुकीवर झालेल्या परिणामामुळे इतर राज्यातून येणारे साहित्य कमी प्रमाणात उपलब्ध आहे. त्यात वाळूउपसा करणारी मशीन व क्रशर मशीन तसेच त्यासाठी लागणारे केमिकल्स व कच्चा माल यांचेसुद्धा दर वाढले आहेत. त्यामुळे ग्राहकांना हव्या तेवढ्या प्रमाणात साहित्य उपलब्ध नाही. यामुळे बांधकाम करणाऱ्यांची चारही बाजूंनी कोंडी झाल्याचे चित्र दिसत आहे. या महागाईमुळे अनेकांचे घर बांधकामाचे बजेट कोलमडले आहेत. यामुळे बांधकामांनाही उशीर होत आहे. बांधकाम साहित्याचे वाढलेले दर त्यात कामगारांना द्यावी लागणारी मजुरी यांचा ताळमेळ बसत नसल्याने अनेकांनी घरांचे बांधकाम पुढे ढकलले आहे. डिझेलचे वाढलेले दर, मजुरांची कमतरता तसेच बांधकाम साहित्याचा तुटवडा यामुळे साहित्याचे दर २० ते ४० टक्क्यांनी वाढले. यामुळे बांधकाम व्यावसायिक तसेच ग्राहकांचे बजेट कोलमडले आहे.

बांधकाम साहित्याचे दर का वाढले? लॉकडाऊनमुळे सर्व व्यवसाय ठप्प होते. यामुळे बांधकाम साहित्य बनवण्याचे कारखाने व मशीन यादेखील बंद होत्या. सर्व मजुरांनी घरची वाट धरल्याने काम करण्यासाठी मजुरांचा तुटवडा भासत होता. आजही या क्षेत्रात पन्नास टक्के मजुरांचा तुटवडा भासत आहे. लॉकडाउनमुळे वाहतूक ठप्प असल्याने बरेच साहित्य इतर राज्यात अडकून पडले होते. यामुळे पूर्व हवेलीत बांधकाम साहित्याची मागणी वाढली आहे. परंतु त्या तुलनेत बांधकाम साहित्याचा पुरवठा कमी होत आहे.

--

लॉकडाऊनपूर्वीचे दर स्टील -३८ ते ४० किलो

सिमेंट -२६० ते २८० प्रति बॅग

वीट-८ ते ९ प्रति नग

लॉकडाऊननंतरचे दर स्टील-५८ ते ६२ किलो

सिमेंट-३५० ते ३६० प्रति बॅग

वीट-९.५० ते १०.५० प्रति नग

कामगार वेतन लॉकडाउनपूर्वी

मिस्त्री -५०० ते ७०० दर दिवस

हेल्पर-४०० ते ५०० दर दिवस

कामगार वेतन लॉकडाउननंतर

मिस्त्री-७०० ते १००० दर दिवस

हेल्पर- ५०० ते ७०० दर दिवस.

--

कोट

लॉकडाऊनपूर्वी ठरवून घेतलेली बांधकामे बांधकाम साहित्य व कामगारांचे वाढलेले पगार यामुळे घेतलेल्या कामाच्या रकमेत व आत्ताच्या खर्चात ताळमेळ बसत नसल्याने तोटा करून कामे करावी लागत आहेत.

नरेंद्र वलटे- बांधकाम व्यावसायिक