पुणे : पुणे महापालिका हद्दीत समाविष्ट होणाऱ्या २३ गावांच्या पार्श्वभूमीवर, पुणे महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी महापालिकेच्या सर्व विभाग प्रमुखांची बैठक पुढील आठवड्यात बोलवली आहे़
पुणे महापालिकेचे सन २०२१-२२ च्या अर्थसंकल्पाचे कामकाम सध्या चालू आहे़ त्यामुळे नव्याने समाविष्ट होणाऱ्या २३ गावांमधील रस्ते, ड्रेनेज, पाणी आदी मुलभूत सुविधांसाठी आगामी अर्थसंकल्पात तरतूद करण्याबाबतचे नियोजन करण्यात येईल़ याकरिता विभाग प्रमुखांच्या बैठकीत सविस्तर आढावा घेऊन, त्याबाबतची आखणी केली जाईल, अशी माहिती कुमार यांनी दिली़ तसेच महापालिकेत समाविष्ट होणाऱ्या गावांमधील विकास कामांकरिता यापूर्वीच शासनाकडे निधीची मागणी करण्यात आली आहे, आता नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांकरिताही निधीची मागणी शासनाकडे केली जाईल, असेही ते म्हणाले़