पुणे : राज्यातील सर्व सैनिकी शाळांची तपासणी करण्यासाठी व सैनिकी शाळांचा अभ्यासक्रम सीबीएसई दर्जाचा करण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली असून त्यात शिक्षण क्षेत्राशी संबंधित १४ जणांचा समावेश आहे.क्रीडा संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, राज्य मंडळाचे अध्यक्ष, खडकवासला राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे सदस्य, पुण्यातील आर्मी पब्लिक स्कूलचे प्राचार्य, राज्यातील अनुदानित सैनिकी शाळा चालविणारे दोन संस्था प्रतिनिधी आदी समितीचे सदस्य आहेत. तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण सहसंचालक हे या समितीचे सदस्य सचिव असतील. या समितीचा कार्यकाल तीन महिन्यांचा असेल शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
सैनिकी शाळांसाठी समिती
By admin | Published: December 11, 2015 2:21 AM