लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : शिवाजीनगर येथील सुधारगृहातल्या अल्पवयीन मुलांना अश्लील चित्रफिती दाखवून कर्मचारी आणि विधीसंघर्षित मुलांनीच त्यांचे लैंगिक शोषण केल्याच्या घटनेचे पावसाळी अधिवेशनात पडसाद उमटल्यानंतर या प्रकरणाची केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी गांभीर्याने दखल घेतली आहे. पुण्यातील बालसुधारगृहांवर लक्ष ठेवण्यासाठी खासदार वंदना चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून, सर्व बालसुधारगृहांची पाहणी करून त्यांचा नियमित अहवाल सादर करण्याचे सूचित करण्यात आले आहे.२0१0 ते १५ या कालावधीमध्ये बालगृहातील कर्मचारी अल्पवयीन पीडित मुलांना प्रोजेक्टरवर अश्लील चित्रफीत दाखवीत होते. त्यानंतर कर्मचारी तसेच इतर विधिसंघर्षित बालक लहान मुलांना बाजूला घेऊन जात चित्रपटामध्ये दाखविल्याप्रमाणे त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य करीत असल्याची धक्कादायक माहिती पीडित मुलांनीच दिल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी बालगृहाचे तत्कालीन अधिकारी आणि कर्मचारी तसेच काही विधिसंघर्षित बालकांवर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना घडल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी या प्रश्नाचा सातत्याने पाठपुरावाकेला होता.आजमितीला शिवाजीनगरच नव्हे, तर येरवडा बालसुधारगृहातही अल्पवयीन मुलांकडून लैंगिक अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून, ही सुधारगृहे मुलांसाठी गुन्हेगारीचे आगार बनत चालली आहेत. बालसुधारगृहातून मुलांचे पळून जाण्याचे प्रमाणही वाढले आहे. तसेच बालसुधारगृहांचा डोलाराही अपुºया मनुष्यबळावर उभा आहे. बालसुधारगृहांची अवस्था अत्यंत बिकट असूनही जिल्हा महिला व बालविकास आयुक्तालय करतंय काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सध्या मुंबईत सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात खासदार वंदना चव्हाण यांनी शिवाजीनगर बालसुधारगृहात घडलेल्या घटनेविरुद्ध वाचा फोडली. केंद्रीय महिला व बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली. खासदार वंदना चव्हाण यांना मनेका गांधी यांनी तत्काळ बोलावून घेतले आणि त्यांच्याशी चर्चा केली. पुण्यातील बालसुधारगृहांमध्ये लैंगिक अत्याचाराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अनेक खासदारांना या बालसुधारगृहांना भेट द्या आणि दिशा कमिटीच्या बैठकीमध्ये हा प्रश्न उपस्थित करा, असे सूचित केले आहे. यापुढील काळात बालसुधारगृहांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष घालून त्यांची पाहणी करावी आणि त्यासंबंधीचा नियमित अहवाल द्यावा विशेषत: शिवाजीनगर सुधारगृहामध्ये घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा महिला व बाल विकास अधिका-यांच्या सहाय्याने सखोल चौकशी करावी आणि कठोर कारवाई करावी, असे विनंतीपत्र गांधी यांनी चव्हाण यांना दिले आहे.केंद्रीय बाल व विकास मंत्री मनेका गांधी यांनी पुण्यातील बालसुधारगृहांची विशेषत: शिवाजीनगरच्या सुधारगृहात घडलेल्या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. या बालसुधारगृहांची पाहणी करून त्याचा नियमित अहवाल सादर करण्याची विनंती त्यांनी केली आहे. अधिवेशन संपल्यानंतर स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञमंडळी, मानसोपचारतज्ज्ञ, पत्रकार यांची एक बैठक घेणार आहे.- वंदना चव्हाण, खासदार
बालसुधारगृहावर लक्ष ठेवणार समिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2017 3:42 AM