पुणे : पुणे शहरात प्रशिक्षण शासकीय कामकाज, शैक्षणिक व वैद्यकीय कामासाठी राज्यभरातून येणाºया पोलीस दलाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी पाषाण रोडवरील पोलीस बिनतारी संदेश मुख्यालयात अत्याधुनिक वातानुकूलित संचार विश्रामगृहाची उभारणी करण्यात आली आहे़. या संचार विश्रामगृहाचे उद्घाटन राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले़. यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. व्यंकटेशम, अपर पोलीस महासंचालक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग अतुलचंद्र कुलकर्णी, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिश्नोई, तसेच पोलीस दलातील विविध घटकांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अपर पोलीस महासंचालक व संचालक पोलीस बिनतारी संदेश रितेशकुमार यांच्या संकल्पनेतून या विश्रामगृहाच्या नूतन वास्तूची उभारणी करण्यात आली आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण, शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय या कामांसाठी पुणे येथे आल्यावर या विश्रामगृहाचा उपयोग होणार आहे. कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ होणार आहे. अत्यंत कमी कालावधीत विश्रामगृह उभारण्यात आले आहे. पोलीस कल्याण योजनेअंतर्गत हे विश्रामगृह बांधण्यात आले असून ते वातानुकूलित आहे. यामध्ये एकूण ३० कक्ष आहेत. येथे निवासादरम्यान अनुदानित तत्त्वावर अल्पदरामध्ये उपाहारगृहाची सोय उपलब्ध असणार आहे. याचा लाभ राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस संशोधन केंद्र, पुणे ग्रामीण मुख्यालय, यशदा या घटकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनादेखील घेता येणार आहे........अल्पदरात विश्रामगृहाची सोयराज्यभरातून विविध कामांसाठी पुण्यात येणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असते़ पुण्यात राहण्याची सोय करण्यात त्यांना अनेक अडचणी येतात. अशावेळी या विश्रामगृहामुळे अल्पदरात येथे सोय उपलब्ध होणार आहे़.
राज्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी संचार विश्रामगृह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2019 1:14 PM
कर्मचाऱ्यांसोबतच त्यांच्या कुटुंबीयांना याचा लाभ होणार
ठळक मुद्देपोलीस महासंचालकांच्या हस्ते उद्घाटन : वातानुकूलित सुविधा निवासादरम्यान अनुदानित तत्त्वावर अल्पदरामध्ये उपाहारगृहाची सोय उपलब्ध असणार शासकीय, शैक्षणिक, वैद्यकीय या कामांसाठी पुणे येथे आल्यावर या विश्रामगृहाचा उपयोग