पुणे : सरळ सेवा भरती प्रक्रियाअंतर्गत होणारी कंपनी निवड अंतिम टप्प्यात असून, पुढील दोन दिवसात ही प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचे महा आयटी कडून स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाखो इच्छुक तरूणांना दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहराध्यक्ष कल्पेश यादव यांना याबाबत महा आयटीकडून पत्राद्वारे कळविले आहे.
राज्यात होऊ घातलेली मेगा भरती ही महा पोर्टल मध्ये झालेल्या भ्रष्टाचारा नंतर थांबवली होती. या भरती साठी नवीन कंपनी निवड महा आयटी कडे दिली आहे. ही कंपनी निवड जवळपास एक वर्षांपासून प्रलंबित आहे. यादव यांच्याकडून मागील आठ महिन्यांपासून याचा पाठपुरावा केला जात आहे. या मागणीसाठी त्यांनी महा आयटी कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते. त्यानंतर पुढील दोन दिवसात अंतिम प्रक्रिया पूर्ण होणार असल्याचा खुलासा महाआयटीकडून पत्राद्वारे केला आहे, असे यादव यांनी सांगितले.