पुणे : अपघातात उजवा हात गमावलेल्या व्यापाºयाला रविवारी झालेल्या महालोकअदालतीमध्ये दिलासा मिळाला. मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दाखल असलेला दावा तडजोडीअंती २४ लाख ५० हजार रुपये देत निकाली काढण्यात आला. सत्र न्यायाधीश एस. एम. मेनजोगे यांच्या पॅनलने हा दावा निकाली काढला.खेड मार्केट यार्डामध्ये व्यापार संदीप बजीरंग गावडे (वय ३८, राजगुरुनगर) हे २२ फेब्रुवारी रोजी चाकण परिसरातून दुचाकीवरून चालले होते. एका चौकात सिग्नलवर थांबले असता मागून आलेल्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले व ट्रक त्यांच्या उजव्या हातावरून गेला. या अपघातात त्यांचा उजवा हात खांद्यापासून निकामी झाला. त्यामुळे नुकसानभरपाई मिळावी, यासाठी गावडे यांनी अॅड. अनिल पटणी आणि अॅड. आशिष पटणी यांच्यामार्फत येथील मोटार अपघात न्यायप्राधिकरण येथे दावा दाखल केला होता.गावडे यांचे वय ३८ आहे. त्यांना आलेल्या अपंगत्वाचा विचार करून जास्तीतजास्त नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती. ट्रकची विमा कंपनी असलेल्या ओरिएंटल इन्श्युरन्स कंपनीच्या विरोधात हा दावा दाखल करण्यात आला होता.तडजोडीसाठी अॅड. अनिल पटणी आणि अॅड. आशिष पटणी आणि ओरिएंटल विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक जोशी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
हात गमावलेल्या व्यापाऱ्याला भरपाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 5:45 AM