शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपची मोठी घोषणा! मुंबईत मनसेच्या या उमेदवाराला पाठिंबा; पूर्ण ताकदीने प्रचार करणार
2
लाडक्या बहि‍णींना महिन्याला ₹2100, शेतकऱ्यांना कर्जमाफी अन्..CM शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
3
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
5
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
6
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
7
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
8
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
10
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
11
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
12
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
13
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
14
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
15
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
16
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
17
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
18
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
19
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
20
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या

स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी आजारांच्या विळख्यात, दोघांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2018 2:54 AM

स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे.

पुणे - स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांना अतिजागरण, सतत चहा पिणे, मेसमधील निकृष्ट जेवण आदी विविध कारणांमुळे पोटाच्या आजारांना सामोरे जावे लागत असल्याची माहिती उजेडात आली आहे. त्याचबरोबर वेळेवर परीक्षा न होणे, परीक्षांमध्ये येणारे अपयश यातून नैराश्यासंबंधी विविध आजारांचाही सामना करावा लागत आहे. या दुर्लक्षामुळेच पोटाच्या तसेच आतड्यांच्या आजाराने दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती उजेडात आली आहे.पुणे शहरामध्ये साधरणत: दीड ते दोन लाख विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत आहेत. दरवर्षी राज्याच्या कानाकोपºयातून पुण्यात अभ्यासाला येणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. शक्यतो पदवीचे शिक्षण घेत असतानाच विद्यार्थी स्पर्धा परीक्षांची तयारी करू लागतात. गेल्या काही दिवसांत या विद्यार्थ्यांना आरोग्याशी संबंधित समस्यांमध्ये वाढ झाली आहे.राज्य लोकसेवा आयोगाकडून काढल्या जाणाºया दरवर्षी काढल्या जाणाºया जागांमध्ये मोठी घट झाली आहे. त्याचवेळी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे त्यांच्यामध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे.परिणामी, रात्रभर जागून अभ्यास करणे, रात्री झोप येऊ नये म्हणून सतत चहा पिणे, ताणतणाव यामुळे त्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. पोटाचे आजार, मूळव्याध, मान व खांदेदुखी, डिप्रेशन अशा विविध आजारांना बहुसंख्य विद्यार्थी सामोरे जात आहेत. त्याचबरोबर आरोग्याकडे केलेल्या सततच्या दुर्लक्षामुळे पोटाचे गंभीर आजार होऊन दोन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यामध्ये इंजिनिअरिंग करणाºया एका विद्यार्थिनीचा समावेश आहे. विशेषत: मुलींकडून आरोग्याची जास्त हेळसांड होत असल्याची माहिती स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी दिली.सातत्याने मसालेदार पदार्थ, फास्ट फूड खाणे, पाणी कमीपिणे, मेसमधील अन्नपदार्थांचानिकृष्ट दर्जा, ५ रुपयांत वडापाव, १० रुपयांत मसाला डोसाअशा स्वस्तातील व निकृष्ट पदार्थांना ते बळी पडत आहेत. यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहेत.एकीकडे परीक्षा वेळेवर होत नाहीत, परीक्षा जाहीर झाली तरी जागांचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यातून अनेक वर्षे अभ्यासकरूनही यश न येणे, वाढते वय, घराकडच्या अडचणी या साºयांमुळे नैराश्य, मानसिक ताणतणाव याला त्यांना मोठ्या प्रमाणात सामोरे जावे लागत आहे.महापालिकेच्या दवाखान्यात उपचारस्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना विविध आजारांचा सामना करावा लागत असला तरी पैशांच्या अडचणींमुळे ते डॉक्टरांकडे जाण्यास ते अनेकदा टाळाटाळ करतात. मराठवाडा, विदर्भ व इतर काही भागातून आलेले अनेक विद्यार्थी महापालिकेच्या आरोग्य केंद्रात जाऊन उपचार घेत असल्याची माहिती विद्यार्थ्यांनी दिली.ईर्षेला बळी पडू नकाविद्यार्थी आपले करिअर घडविण्याच्या स्पर्धेत आरोग्याची अक्षम्य हेळसांड करीत आहेत. आपल्या बरोबरचा मित्र १० तास अभ्यास करतो, तर आपण त्याच्यापेक्षा जास्त वेळ अभ्यासाला बसायचेच अशा ईर्षेलाही ते बळी पडत आहेत. बहुसंख्य विद्यार्थी व्यायामही करीत नाहीत. विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आरोग्य जपणे आवश्यक आहे.- महेश बढे, प्रतिनिधी, एमपीएससी राइटआयडियल टाइम टेबलचाअवलंब करावाअलीकडच्या काळात विद्यार्थ्यांच्या आजारपणाविषयीच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. हे टाळण्यासाठी त्यांनी आयडियल टाइम टेबलचा अवलंब करावा. यामध्ये रात्री ११ ते ५ या वेळेत झोप घेतलीच पाहिजे. रात्री अभ्यास करण्याऐवजी पहाटे उठून अभ्यास केल्यासत्याचा जास्त फायदा होऊ शकेल. जास्त तिखट खाणे वा इतर कोणत्याही कारणापेक्षा रात्रीच्या जागरणामुळे अ‍ॅसिडिटी मोठ्या प्रमाणात वाढते, त्यामुळे जागरण करणे टाळावे. त्याचबरोबर वेळेवर जेवण करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये स्टॉलवरचे चायनिज पदार्थ तसेच आॅनलाइन वेबसाइटवरून आॅर्डर करून मसालेदार पदार्थ खाण्याचे प्रमाण खूपच जास्त आहे. त्याचेही परिणाम त्यांना भोगावे लागत आहेत. अनेकदा अभ्यास करताना बाक काढून बसणे, जास्तीत जास्त वेळ त्याच अवस्थेत राहण्याने त्यांना पाठ व मानदुखीच्या आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे अभ्यास करण्याची पद्धत योग्य ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.- डॉ. हेमंत अडसूळ,जनरल फिजिशिअन 

टॅग्स :Studentविद्यार्थीnewsबातम्या