पुणे: पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून अभिनेता रणवीर सिंग याच्या विरोधात तक्रार नोंदवण्यात आली आहे. अभिनेता रणवीर सिंगवर मनसेे शारीरिक सेना, पुणे शहर यांच्याकडून पोलिस आयुक्तालयात तक्रार करण्यात आली आहे. मनसे शारीरिक सेना, पुणे शहराचे अध्यक्ष निलेश काळे यांच्याकडून कलम 354, 509, 67 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
सोशल मीडियावर न्यूड फोटो प्रसिद्ध करून हिंदू संस्कृतीचा अपमान करत व स्त्रियांना फोटो पाहताना लाज वाटेल असे व तरुण वर्गाला बिघडवण्याची, त्यात वयात येणारी लहान मुले यांच्यावर वाईट संस्कार होण्याची भीती दर्शवली आहे, असा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.
आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरून लवकरात लवकर काढावे अशी मागणी मनसेने यावेळी केली. प्रसिद्ध अभिनेत्याचे अनुकरण इतर लोक पण करू शकतील असा अंदाज वर्तवत या अभिनेत्याच्या कृत्यांना चाप बसला पाहिजे अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली.