शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "मी शरद पवारांना सोडलं नाही, सगळ्या आमदारांना..." अजित पवारांचं बारामतीत मोठं विधान
2
इंग्रजांप्रमाणेच जातीजातीत भांडणे लावण्याचे कॉंग्रेसचे धोरण; योगी आदित्यनाथ यांचा हल्लाबोल
3
राज ठाकरेंची खाट टाकून त्यांची राजकीय अंत्ययात्रा काढू; संजय राऊतांची जहरी टीका
4
काँग्रेस म्हणजे लबाडाचं आवताण, शेतकऱ्यांना खोटं सांगतंय; देवेंद्र फडणवीसांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
6
दोन ठिकाणी मतदान कार्ड; तुरुंगवास होऊ शकतो मतदारराजा!
7
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना उत्तम, धनलाभ-पदोन्नती योग; सुख-समृद्धी, शुभ लाभदायी काळ!
8
दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी, भाजपचे नेते अनिल झा 'आप'मध्ये सामील
9
उद्धव ठाकरे यांनी केलेल्या त्या टीकेमुळे शंभुराज देसाई संतप्त, दिलं असं प्रत्युत्तर, म्हणाले...
10
"शरद पवारांना हिंदूंबद्दल बोलण्याची भीती वाटते?", व्होट जिहादवरुन किरीट सोमय्या संतापले
11
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
12
नात्याला काळीमा! ७ महिन्यांच्या गरोदर महिलेची सासरच्यांनी केली हत्या, २५ तुकडे अन्...
13
नाकाबंदीत थरार! नागपुरात कारचालकाने पोलीस अधिकाऱ्याला फरफटत नेले; सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना
14
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
15
Mumbaikar Cricketer Jemimah Rodrigues, WBBL 10: मुंबईकर पोरीने ऑस्ट्रेलियामध्ये केला मोठा धमाका! गोलंदाजांची धुलाई करत फिरवला सामना
16
PM मोदींच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; नायजेरियाने केला सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
17
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
18
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
19
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
20
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान

मलघेवाडी रस्त्याचे काम निकृष्ट असल्याची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2021 4:09 AM

-- दावडी : मलघेवाडी (ता. खेड) येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामुळे काही दिवसांतच ...

--

दावडी : मलघेवाडी (ता. खेड) येथील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, त्यामुळे काही दिवसांतच रस्ते पुन्हा खराब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुसरीकडे शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे, अशी तक्रार ग्रामस्थांनी केली असून या कामाची गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून चौकशी करावी अशी मागणीही केली आहे.

मलघेवाडी येथे गेले कित्येक वर्षे गावात जाण्यासाठी चांगला रस्ता नव्हता. यापूर्वी जे डांबरी रस्ते झाले ते व्यवस्थित झाले नाही. जिल्हा परिषद फंडातून या गावाच्या रस्त्यासाठी ३० लाख रुपये निधी मंजूर झाला होता. यामधून २५० मीटर सिमेंटी रस्ता व २०० मीटर डांबरी रस्ता नुकताच तयार करण्यात आला. नागरिकांची मागणी होती या रस्त्याचे काम दर्जेदार व्हावे, काम सुरू असतानाच नागरिकांनी निकृष्ट कामाबाबत तक्रारी केल्या होत्या. अनेक वेळा ठेकादारांबरोबर ग्रामस्थांची भांडणे झाली. मात्र प्रशासनाने यांची दखल घेतली नाही.

रस्त्याचा काही भाग कॉंक्रिटीकरण करण्यात आला आहे मात्र त्यावर हवे तेवढे पाणी मारण्यात आले नाही. त्यामुळे रस्ता किती दिवस टिकणार, असा प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. साईट पट्या व्यवस्थित भरण्यात आल्या नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. हा रस्ता वर्दळीचा असून या मार्गाने नागरिक यांची नेहमी ये-जा सुरू असते. त्यामुळे संपूर्ण रस्ता मजबूत होणे अत्यावश्यक होते. कामाचा योग्य दर्जा राखला जात नसल्याने लागलीच रस्त्यावरील सिमेंट व डांबर उघडणे, रस्ता खचणे, खड्डे निर्माण होणे असे प्रकार होणार आहेत. रस्त्याच्या पायाचे काम चांगल्या दर्जाचे झाले नसल्याने हा रस्ता पुढे किती दिवस तग धरणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच डांबरीकरण रस्त्याला माती मिश्रीत मुरुम टाकण्यात आला.हवे तसे मजबुतीकरण्यात आले नाही. डांबरच निकृष्ट दर्जाचे वापरल्यामुळे हा रस्ता किती दिवस टिकणार अशी शंका निर्माण झाली आहे.

--

०५दावडी रस्त्याचे काम

फोटो ओळ: मलघेवाडी (ता. खेड ) येथे रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहे...