मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १३ जानेवारी २०२१ रोजी संतोष बन्सी भोर (रा. वळती, ता. आंबेगाव) हे विजेचा चोरून वापर करत असल्याची माहिती वरून कनिष्ठ अभियंता अजय शेवकरी, प्रमोद मारबते, राजू शेवाळे, अनिकेत काळे व पंचसह मीटरची तपासणी केली. त्यावेळी मीटर बायपास असल्याचे आढळून आले. त्यांच्या मीटरमध्ये येणारा विद्युत पुरवठा लघू दाबाच्या वाहिनीवरून तोडून बंद केला. ही बाब वीजचोरी प्रकरणात येत असल्याचे दिसून आले, त्यानुसार त्यांना १८०० युनिटचे १९,६६० रुपये आर्थिक नुकसान केले. याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. वीज ग्राहकांना देण्यात आलेले वीज चोरीचे १९,६६० रुपये बिल २१ जानेवारी २०२१ रोजी त्यांनी भरले. परंतु तडजोडप्रकरणी १० एचपी प्रमाणे एक लाख रुपये महावितरणकडे भरणा केला नसल्याकारणाने तक्रार दाखल केली आहे.
वीजचोरीप्रकरणी तडजोड रक्कम न भरल्याने तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:08 AM