शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

पालकमंत्र्यांच्या दबावामुळेच गुन्हा दाखल

By admin | Published: November 08, 2016 1:49 AM

बेकायदेशीरपणे वृक्षतोड झाल्याप्रकरणी उद्यान विभागातील कर्मचाऱ्याला जाब विचारला असता, त्याला शिवीगाळ केली म्हणून माझ्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला

पुणे : बेकायदेशीरपणे वृक्षतोड झाल्याप्रकरणी उद्यान विभागातील कर्मचाऱ्याला जाब विचारला असता, त्याला शिवीगाळ केली म्हणून माझ्यावर रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट यांच्या दबावामुळेच हा गुन्हा दाखल करण्यात आला, असा धक्कादायक आरोप मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केला.महापालिकेच्या मुख्यसभेमध्ये रवींद्र धंगेकर यांनी त्यांच्या प्रभागात झालेली बेकायदेशीर वृक्षतोड व त्यावरून त्यांच्यावर दाखल झालेला गुन्हा याची माहिती दिली. त्या वेळी भाजपाचे गटनेते गणेश बिडकर, नगरसेवक अशोक येनपुरे यांनी त्याला आक्षेप घेऊन उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्याची बाजू लावून धरली. त्यानंतर मनसेचे गटनेते किशोर शिंदे, नगरसेवक बाळा शेडगे हे धंगेकर यांच्या मदतीला धावून आले.रवींद्र धंगेकर म्हणाले, ‘‘पालकमंत्री छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये लक्ष घालत आहेत. त्यावरून ते बघून घेऊ, अशा धमक्या देतात. पालिकेचा एक सेवक त्यांच्या घरी दळण आणण्याचे काम करतो. मला रविवारी पोलीस ठाण्यातून फोन आला, आमच्यावर मंत्र्यांचा दबाव असून, तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. महापालिकेचा सेवक बेकायदेशीर वृक्षतोड करीत असल्याने तो गंभीर प्रकार आहे. त्यामुळे जोपर्यंत त्याच्याविरुद्ध कारवाई होत नाही, तोपर्यंत माझे धरणे आंदोलन सुरू राहणार आहे.’’बाळा शेडगे यांनी बेकायदशीरपणे वृक्षतोड करणाऱ्या कर्मचाऱ्याला निलंबित करण्याची मागणी केली. याप्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध उद्यान विभागाकडून काय कायदेशीर कारवाई केली जाणार आहे, याची विचारणा किशोर शिंदे यांनी केली.प्रशासन निष्पक्षपातीपणे काम करीत नाहीत. अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्यास सांगितले असता, त्यांच्याकडून कारवाई केली जात नाही, अशी टीका अविनाश बागवे यांनी केली.भाजपा व मनसेच्या नेत्यांनी महापौरांच्या दालनात बसून हा विषय संपवावा, अशी सूचना सभागृह नेते बंडू केमसे व काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका कमल व्यवहारे यांनी या वेळी केल्या. (प्रतिनिधी)