पुणे : गुंतवणुकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्याविरुद्ध आतापर्यंत ५ हजार १३८ जणांनी तक्रारी दिल्या असून त्यातील रक्कम ही ३६७ कोटी रुपयांहून अधिक आहे. डी़ एस़ कुलकर्णी यांना अटक झाल्यानंतर आता पुन्हा तक्रारदारांचा ओघ वाढला आहे़ आर्थिक गुन्हे शाखेने ५ मार्चपासून पुन्हा तक्रारी घेण्यास सुरुवात केली़ गुरुवारी एकाच दिवसात १८० जणांनी आपल्या तक्रारी नोंदविल्या आहेत़ गुरुवारी एकाच दिवसात १८० जणांनी तक्रारी दिल्या.
विशेष न्यायालयाने डी़ एस़ कुलकर्णी आणि त्यांच्या पत्नी हेमंती कुलकर्णी यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मंजूर केली आहे़ याबाबत सहायक पोलीस आयुक्त निलेश मोरे यांनी सांगितले की, डी एस के यांच्या एकूण ६९ कंपन्या आहे. त्यांच्या २७६ बँक खाती गोठविली आहे़ त्यांच्याविरुद्ध आतापर्यंत ५ हजार १३८ जणांनी ३६७ कोटी रुपयांच्या तक्रारी दाखल केल्या आहेत. याशिवाय वैयक्तिक कर्ज दिल्याप्रकरणी १५ जणांनी तक्रारी दिल्या असून त्यातील रक्कम ७७ कोटी ५७ लाख रुपये इतकी आहे.
क्राउड फंडिगद्वारे पैसा गोळा करण्याची मोहिम सुरु करण्यात आली आहे़ याविषयी त्यांनी सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखेने त्यांची बँक खाती गोठविली आहेत़ त्यातून कोणालाही पैसा काढता येणार नाही़ परंतु, त्या खात्यात पैसे भरण्यास कोणालाही मज्जाव नाही़ त्यात जमा होणारा पैसा हा न्यायालयाच्या निर्णयानुसार वाटप होईल़ आर्थिक गुन्हे शाखेकडे मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्या मालमत्तेपैकी पुण्यातील बंगला व महाबळेश्वरमधील घर या दोन्ही मालमत्ता बोजारहित असल्याचे दिसून आले आहे.
डीएसके यांचे पुत्र शिरीष कुलकर्णी यांच्या अटकपूर्व जामीनावर बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होती़ परंतु, ती दुसºया न्यायालयात चालविण्यात यावी, असे न्यायालयाचे मत पटल्याने ही सुनावणी पुढे ढकलली गेली आहे.