शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण, लघुपटांचेही संवर्धन, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात खराब रिळांची शासन मान्यतेनंतर विल्हेवाट  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2017 3:35 AM

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सध्या सुमारे दीड लाख रिळे उपलब्ध आहेत. एक वर्षापूर्वी हाती घेतलेल्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्णत्वाला जात आहे. रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण झाली असून, त्यांची अवस्था तपासण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या तपासणीसाठी चेन्नई तसेच इटलीतील चित्रपट प्रयोगशाळांना पाचारण करण्यात आले आहे.

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाकडे सध्या सुमारे दीड लाख रिळे उपलब्ध आहेत. एक वर्षापूर्वी हाती घेतलेल्या डिजिटायझेशन प्रकल्पाचा पहिला टप्पा लवकरच पूर्णत्वाला जात आहे. रिळांची रासायनिक तपासणी पूर्ण झाली असून, त्यांची अवस्था तपासण्याचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. या तपासणीसाठी चेन्नई तसेच इटलीतील चित्रपट प्रयोगशाळांना पाचारण करण्यात आले आहे.राष्टÑीय चित्रपट संग्रहालयाच्या वतीने चित्रपटांच्या रिळांच्या संवर्धनासाठी डिजिटायझेशनचा पाच वर्षांचा प्रकल्प ‘नॅशनल फिल्म हेरिटेज मिशन’ अंतर्गत हाती घेण्यात आला आहे. यांअतर्गत दुर्मिळ चित्रपट रिळांचे जतन-संवर्धन करण्यात येत आहे. यामध्ये तपासणी, स्थितीनुसार अ, ब आणि क अशी वर्गवारी, जतन आणि संवर्धन, डिजिटायझेशन, तांत्रिक पर्याय, स्टोअरेज क्षमता वाढवणे आदी टप्प्यांमध्ये प्रकल्पाचे काम सुरू आहे. प्रकल्पास सुरुवात करण्यापूर्वी देशभरातील संग्रहालये, संस्था, प्रयोगशाळा, चित्रपट क्षेत्राशी संबंधित जाणकार, संशोधक यांच्या देशभरात आठ कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. त्यानंतर टेंडर तयार करून पुढील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. तपासणी आणि संवर्धनानंतर वॉल्टची तपासणी केली जाणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये संवर्धनाचे काम पूर्ण होणार असून, डिजिटायझेशनचे काम हाती घेण्यात येणार आहे. कोल्ड स्टोअरेजचीही काटेकोरपणे तपासणी केली जात आहे, अशी माहिती संतोष अजमेरा यांनी दिली.रिळांच्या संवर्धनासह ४००० लघुपट आणि फिचर फिल्मचे जतन करण्यावर भर देण्यात येत आहे. शनल फिल्म हेरिटेज मिशनअंतर्गत सध्या चित्रपटांच्या जतानाचे काम वेगाने सुरू आहे. या मिशन अंतर्गत आम्ही विविध संस्था, व्यक्तींना त्यांच्याकडील लघुपट तसेच चित्रपटांचा दुर्मिळ वारसा एनएफएआयकडे सुपूर्त करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. संवर्धनासाठी देशभरातील तसेच देशाबाहेरील चित्रपटतज्ज्ञांशी चर्चा करण्यात आली असून, त्यानुसार ८-९ प्रकारचे प्राधान्यक्रम ठरवण्यात आले आहेत.- प्रकाश मगदूम, संचालक, एनएफएआयसध्या संग्रहालयाची स्टोअरेज क्षमता मर्यादित आहे. संग्रहालयात केवळ १९ वॉल्ट उपलब्ध आहेत. यामध्ये ३० टक्के आर्द्रता आणि २ अंश सेल्शिअस तापमानाला फिल्म जतन केल्या जातात. संग्रहालयातील रिळांची चित्रपट जाणकारांकडून तपासणी करण्यात आली असून, खराब रिळे वेगळी करण्यात आली आहेत. या रिळांच्या सुस्थितीतील प्रती संग्रहालयाकडे उपलब्ध आहेत. खराब रिळांची शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर विल्हेवाट लावली जाणार आहे. या रिळांच्या सुस्थितीत असलेल्या प्रती संग्रहालयाकडे जतन करून ठेवण्यात आल्या आहेत. खराब रिळेही विशिष्ट तापमानात ठेवण्यात आली आहेत.- संतोष अजमेरा, विशेष कार्य अधिकारी, नॅशनल फिल्म हेरिटेज मिशनडिजिटायझेशन केलेले चित्रपट पुन्हा रीळ स्वरूपात विकसित करण्यात येणार आहेत. त्यामुळे हा प्रकल्प पुढील अनेक वर्षे चित्रपटांचे जतन होण्यास उपयुक्त ठरणार आहे.राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने साकारलेलाहा प्रकल्प जगातील एकमेव ठरणार असून, जागतिक स्तरावरदेखील मार्गदर्शक म्हणून त्याकडे पाहिले जात आहे.संग्रहालयामध्ये सुमारे१०००नायट्रेट फिल्म रिल्स आहेत. बराच मोठा कालावधी लोटल्यामुळे रिल्सचे रासायनिक प्रक्रियेमुळे तसेच भौैतिक नुकसान होत आहे.ऐतिहासिक ठेवा जपण्यासाठीअशा प्रकारच्या नुकसानापासून चित्रपटांचा ऐतिहासिक ठेवा जपता यावा, यासाठी रिल्सची तपासणी, दुरुस्ती आणि संवर्धन करण्यातयेत आहे.डिजिटायझेशन झालेले चित्रपट पुन्हा होणार जतनसध्या एनएफएआयमध्ये १८ ते २० हजार चित्रपट संग्रहित आहेत. या चित्रपटांचे १ लाख ३० हजार अधिक रिळे जतन करून ठेवण्यासाठी प्रकल्प राबवण्यात आला आहेत. डिजिटायझेशन झालेले चित्रपट पुन्हा नव्याने जतन करण्यात येणार आहेत.

टॅग्स :Puneपुणेentertainmentकरमणूक