पुणे: राज्याच्या तिजोरीत सर्वाधिक महसूल देणाऱ्या नोंदणी व मुद्रांक विभागाने पाच महिन्याच्या कालावधीतच शासनाने ठरविलेल्या महसुल उत्पन्नाच्या उद्दिष्ठापैकी सुमारे ५० टक्के उद्दीष्ट पूर्ण केले आहे. यंदा या विभागाला २४ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले असून विभागाने गेल्या पाच महिन्यातच ११ हजार ४०३ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा केले आहे. गेल्यावर्षी या २१ हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले होते.विभागाने डिसेंबर महिन्यातच ते पूर्ण केले.त्यामुळे मार्च अखेरपर्यंत २३ हजार कोटी रुपयांचे नवे उद्दिष्ट दिले. त्यापैकी २६ हजार ४७० कोटींचे महसूल उत्पन्न जमा केले. नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे जमीन खरेदी विक्री व्यवहार,भाडेकरार,सदनिका विक्री,दस्त नोंदणी,विवाह नोंदणी व मृत्यूपत्र नोंदणी आदी कामे केली जातात. कमी मन्युष्यबळाचा वापर करून सर्वाधिक उत्पन्न देणारा विभाग अशी ओळख नोंदणी व मुद्रांक विभागाने निर्माण केली आहे. विभागातर्फे सर्व व्यवहार आॅनलाईन पध्दतीने होत असल्याने त्यात पारदर्शकता आली आहे. शासनाने डिसेंबर महिन्यात वाढवून दिलेले उद्दीष्टपेक्षा तब्बल साडेतीन कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न अधिक जमा केले होते. त्यामुळे नोंदणी व मुद्रांक विभागाने शासनाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा सध्या १ हजार ४०३ कोटी रुपये अधिकचे महसूल उत्पन्न जमा केले आहे. नोंदणी व मुद्रांक विभागाने एप्रिल महिन्यात २०१५.९७ कोटी,मे महिन्यात २३०४.९८ कोटी,जूनमध्ये २३५८.७५ कोटी,जुलैमध्ये २२९२.३० कोटींचे महसूली उत्पन्न जमा केले आहे. तसेच आॅगस्ट महिन्यात २३९५ कोटी रुपये उत्पन्न जमा झाले आहे. त्यातील एप्रिल ते जुलै महिन्यात जमा झालेले महसूली उत्पन्न महालेखापालांनी निश्चित केले आहे.
नोंदणी व मुद्रांकचे ५ महिन्यातच अर्धे उद्दिष्ट पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 7:52 PM
यंदा या महसुल विभागाला २४ हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट देण्यात आले असून विभागाने गेल्या पाच महिन्यातच ११ हजार ४०३ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा केले आहे.
ठळक मुद्देजमीन खरेदी-विक्री व्यवहार,भाडेकरार,सदनिका विक्री,विवाह नोंदणी व मृत्यूपत्र नोंदणी आदी कामे गेल्या पाच महिन्यातच ११ हजार ४०३ कोटी रुपयांचे महसूली उत्पन्न जमा