पिंपरी : पन्नास कोटींपेक्षा अधिक उलाढाल असणाऱ्या उद्योगांना एलबीटी आकारण्याचा निर्णय आॅगस्टपासून घेण्यात आला. त्यामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम होणार असल्याची चिंता व्यक्त केली जात होती. मात्र, जानेवारीअखेरच एलबीटी विभागाने आपले उद्दिष्ट पूर्ण केले आहे. एलबीटी नसतानाही उत्पन्नाची श्रीमंती कायम ठेवली आहे.एलबीटीत सवलत मिळाल्यांची संख्या अधिक असल्याने उत्पन्न घटणार, अशी भीती होती. खर्चावर नियंत्रण आणावे, असा सूर महापालिका सभेतही उमटला होती. उत्पन्नाचे स्रोत वाढविण्यासाठी प्रयत्न करा, अशी सूचनाही केली होती.
पिंपरी पालिकेचे उत्पन्न उद्दिष्ट पूर्ण
By admin | Published: January 28, 2016 3:11 AM