यासाठी दीपक निकाळजे सामाजिक विकास संस्था व सिद्धार्थ तरुण मंडळ नवा मोदीखानाचे अध्यक्ष सुमित शेलार यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
त्यामुळे आज पुन्हा यासारखी घटना घडू नये म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाने त्वरित याबाबत युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात म्हणून आज संघटनेच्या वतीने मुख्यकार्यकारी अधिकारी अमित कुमार यांना निवेदन देण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष रतीक धेंडे, सचिव हृषीकेश कदम उपस्थित होते.
या वेळी अमित कुमार यांच्या वतीने कॅन्टोन्मेंटचे आरोग्य अधीक्षक रियाझ शेख यांची भेट घेण्याचे संघटनेच्या कार्यकर्त्याना सांगण्यात आले. शेख यांच्या भेटीदरम्यान त्यांनी कॅन्टोन्मेंट भागात करण्यात आलेल्या उपाययोजना संदर्भात त्यांनी माहिती दिली व अजून काही मदत लागत असल्यास ती प्राथमिकतेने केली जाईल, असे आश्वासनही देण्यात आले.