पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट विभागातर्फे महाराष्ट्र व गोवा येथील विद्यार्थ्यांसाठी २८ जानेवारी रोजी घेतल्या जाणा-या सेट परीक्षेची तयारी पूर्ण झाली आहे. या परीक्षेस एकूण ७८ हजार ३३० विद्यार्थी प्रविष्ठ झाले असून एकूण १५४ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेतली जाईल.सुमारे ८४ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी आॅनलाईन अर्ज केले होते. त्यातील केवळ ७८ हजार विद्यार्थ्यांनी वेळेत शुल्क भरून अर्ज सबमीट केले आहेत. परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेशपत्र (हॉल तिकीट) संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे.परीक्षा सुरू होण्यापूर्वी एक तास आधी प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षा केंद्रात उपस्थित राहणे बंधनकारक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना सकाळी ९ वाजता परीक्षा केंद्रावर पोहचावे लागणार आहे. परीक्षा केंद्रावर उशीरा पोहचणाºया विद्यार्थ्यांना कोणत्याही कारणाने प्रवेश दिला जाणार नाही.
सेट परीक्षेची तयारी पूर्ण, रविवारी परीक्षा : ७८ हजार विद्यार्थी प्रविष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 26, 2018 5:41 AM