एमपीएससीतर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध पदांच्या परीक्षा देण्यासासाठी मर्यादा घातल्या असून त्याबाबतचे परिपत्रक आयोगाने प्रसिध्द केले आहे. त्यावर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे काही विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त करत आहेत. तर काही विद्यार्थी नारज आहेत.आयोगाकडून विविध पदांच्या भरतीसाठी नियमितपणे जाहिरात प्रसिध्द केली जात नाही. त्यामुळे आयोगाने भरती प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.
---
आयोगाने घेतलेल्या निर्णयामुळे एएसओ, पीएसआय आणि एसटीआय पदांची परीक्षा देणा-या विद्यार्थ्यांच्या संधी कमी होणार आहेत. तीनही पदांसाठी एकच संधी देण्याचा निर्णय विद्यार्थी हिताचा असणार नाही.त्यामुळे आयोगाने संयुक्त परीक्षा न घेता या सर्व पदांसाठी स्वतंत्र परीक्षा घ्यावी.
- सुवर्णा पगार, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा
--
सातत्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास केल्याने अनेक विद्यार्थी अपयश आल्याने बेरोजगार होतात. एमपीएससीने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून याबाबत विद्यार्थ्यांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मात्र,आयोगाने वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि उपजिल्हाधिकारी पदांसारख्या मोठ्या पदांच्या जाहिरातील नियमित प्रसिध्द केल्या पाहिजेत. आयोगाने ईडब्ल्यूएस बाबत स्वतंत्रपणे विचार करणे अपेक्षित होते.
- अनुप देशमुख, विद्यार्थी, स्पर्धा परीक्षा
--
युपीएससीने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. मात्र, युपीएससीच्या धरतीवर आयोगाने सर्व पदांची पदभरती नियमितपणे करावी. विद्यार्थी या पुढे प्रत्येक परीक्षा गांभिर्याने देतील.
- चंद्रकांत भारूडे, विद्यार्थी, एमपीएससी