वेताळे येथे ई अँड पी युनिटी फार्मच्या वतीने गावात स्वच्छता राखण्यासाठी आणि महिलांचे उत्पन्न वाढविण्यासाठी दोन ई अँड पी कचरा प्रक्रिया युनिट बचत गटाच्या माध्यमातून कार्यान्वित केला आहे. ग्रामपंचायत ई अँड पी युनिट स्थापन करण्यात येऊन बचत गटाच्या माध्यमातून ग्रामस्थांना ओला व सुका कचरा या संदर्भात मार्गदर्शन करून तयार होणारे खत शेतकऱ्यांना कमीतकमी किंमत विकून त्यांच्या उत्पन्न वाढीबरोबरच जमिनीचा पोत सुधारणा होण्याबरोबर सेंद्रिय पीक उत्पादन घेण्यास मदत होणार आहे.
ग्रामपंचातीच्या सरपंच सविता बोंबले आणि सदस्य मंडळीच्या देखरेखी खाली सावित्री महिला बचत गट, मुक्ता देवी महिला बचत गटासह सात बचत गटांतील १३७ महिलांच्या सहभागातून उत्पन्न वाढणार आहे. यामुळे गावासह परिसरातील ६ वाड्या-वस्त्या कचरामुक्त होणार आहे, हा घनकचरा प्रकल्प यशस्वी करण्यासाठी चैतन्य फाउंडेशन, जिल्हा परिषद पाणी व स्वच्छता तज्ज्ञ विक्रम शिंदे यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे ग्रामपंचायत सदस्या कविता बोंबले यांनी सांगितले.
या वेळी रेखा राव, शुभांगी बोंबले, संध्या सांडभोर, स्वाती जाधव, मनीषा बोंबले, नंदाबाई सिलकर, मंदाकिनी बोंबले, वैशाली वाळुंज, शारदा बोंबले, आयशा शेख, मुन्सीफ शेख उपस्थित होते.