पुणे : पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका परिसरातील कनिष्ठ महाविद्यालयातील अकरावी प्रवेश अर्जाचा पहिला भाग संबंधित कनिष्ठ महाविद्यालयांना भरणे अनिवार्य केले जाणार आहे. त्यामुळे सायबर कॅफेच्या माध्यमातून अकरावी प्रवेश अर्ज भरून घेण्यासाठी होणारी विद्यार्थ्यांची लूट थांबणार आहे. तसेच, विद्यार्थ्यांचे अर्ज भरलेल्या संख्या विचारात घेऊनच महाविद्यालयांना मानधन देण्यात येणार आहे. पुणे विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयातर्फे यंदाही आॅनलाइन प्रवेशप्रक्रिया राबविली जाणार आहे. कनिष्ठ महाविद्यालयांची नोंदणी सुरू झाली आहे. तसेच, इयत्ता दहावीची परीक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांची व त्यांच्या पालकांची येत्या ३० मार्च ते १० एप्रिल या कालावधीत शाळांनी सभा घ्यावी. तसेच, त्यांना प्रवेशप्रक्रियेबाबत माहिती द्यावी, अशा सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत. तसेच, प्रत्यक्षात आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २५ मेनंतर होणार आहे. (प्रतिनिधी)
अर्ज भरण्याची महाविद्यालयांना सक्ती
By admin | Published: March 24, 2017 4:18 AM