लोकमत न्यूज नेटवर्कभिगवण : ब्रेन ट्यूमरसारख्या गंभीर आजाराने तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या आपल्या मित्राला काळाने उचलून नेल्याने दु:खाच्या सागरात पडलेल्या मित्रांनी त्याच्या स्मृती जपण्यासाठी ज्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले, त्या जिल्हा परिषद तक्रारवाडी शाळेला सहा संगणकांची लॅब दिली.सातवीच्या वर्गात १० वर्षांपूर्वी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी स्नेहसंमेलन कार्यक्रम घेऊन या लॅबचे मित्राच्या आई-बाबांच्या हस्ते उद्घाटन करून या शाळेत शिक्षण घेणाऱ्या ४०० विद्यार्थ्यांची गरज पूर्ण केली.तसेच सर्वांनी एकत्र येत निखिलच्या आई-बाबांना याची माहिती देत याचे उद्घाटन त्यांच्याच हस्ते करण्यात आले. स्नेहसंमेलन कार्यक्रमाचे आयोजन करीत निखिलच्या मित्र परिवार अमर सुतार, विकास गानबोटे, तेजस धुमाळ, उत्कर्षा पवार, रामभाऊ पिसाळ, सागर ठाकूर, गुरलिंग कुरूळकर, तैमुर मुलानी, अक्षय वाघ, अतुल माने, नाना कुदळे, सागर वाघ, अक्षय शहाणे यांनी एकत्र येत समाजोपयोगी कार्य पार पाडले.
मित्राच्या स्मृतीसाठी शाळेला संगणक लॅब
By admin | Published: June 28, 2017 3:58 AM