कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थी शाळेत येऊ शकत नाही. मात्र, विद्यार्थ्यांचे शिक्षण अखंड चालू राहावे व विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये ही समाजातील प्रत्येक घटकाची अपेक्षा आहे. याकरिता व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून मायक्रोसॉफ्ट टिम्स, गुगल मीट, झूमद्वारे ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या शाळांमध्ये ऑनलाइन शिक्षण अखंड सुरू आहे. यापार्श्वभूमीवर नगरसेवक भोसले यांनी पुढाकार घेऊन एक संगणक प्रशालेला सुपूर्द केला.
याप्रसंगी अध्यक्ष सुरेशकाका वडगावकर, सचिव अजित वडगावकर, उपमुख्याध्यापक सिद्धनाथ चव्हाण, पर्यवेक्षक सूर्यकांत मुंगसे, किसन राठोड, प्रशांत सोनवणे, शिक्षक प्रतिनिधी अल्लाबक्ष मुलाणी, शिक्षकेतर प्रतिनिधी पूजा भोसले आदी उपस्थित होते.
--
फोटो क्रमांक : १९ आळंदी विद्यामंदिर संगणक भेट
फोटो ओळ : ज्ञानेश्वर प्रशालेला संगणक सुपूर्द करताना नगरसेवक भोसले.