शेलपिंपळगाव : खेड तालुक्याच्या विविध गावांमध्ये तसेच नगरपरिषद हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून तालुक्याची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. बुधवारी तब्बल ३० गावे आणि तीन नगरपरिषद हद्दीत नवीन ६१ रुग्ण मिळून आले आहेत. विशेष म्हणजे पाच रूग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
खेड तालुक्यातील आजतागायत एकूण रुग्णांचा आकडा ३४ हजार २२७ झाला आहे. यापैकी ३३ हजार ४७४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी दिवसभरात ८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. तर सद्य स्थितीत २४४ सक्रिय रुग्ण आहेत. खेड तालुक्यात एकूण मृतांचा आकडा आजपर्यंत ५०९ एवढा आहे. बुधवारी सायंकाळी पाचपर्यंत मिळालेल्या रुग्णांपैकी तालुक्याच्या ग्रामीण भागात ४६ रुग्ण, चाकण ६, आळंदी १ व राजगुरुनगर ८ असे एकूण ६१ नवे रुग्ण मिळाल्याची माहिती खेड तालुका आरोग्य प्रशासनाने दिली.
यापैकी आंबेठाण १, बहुळ २, भोसे १, चऱ्होली खुर्द २, चास ३, चिंबळी २, चिंचोशी १, गोलेगाव १, गोणवडी १, कडूस २, काळेचीवाडी २, कनेरसर १, खालुम्बरे १, खराबवाडी २, कोये १, कुरुळी १, मरकळ ३, मेदनकरवाडी १, महाळुंगे १, मोहितेवाडी २, मोई २, निघोजे २, पाचर्णेवाडी १, पूर ३, सिद्धेगव्हाण १, तळावडे १, वाडा १, वाफगाव १, येलवाडी २ असे ग्रामीण भागात रुग्ण मिळून आले आहेत.