हार्मनी इव्हेंट्स प्रस्तुत, स्वरसाज निर्मित आणि मनीषा निश्चल्स महक आयोजित 'खयाल-ए-खय्याम' स्वरमैफलीचे आयोजन करण्यात आले होते. प्रसिद्ध संगीतकार मोहम्मद जहुर खय्याम हाशमी अर्थात खय्याम यांच्या जयंतीनिमित्त 'खयाल-ए-खय्याम' स्वरमैफलीतून त्यांना अभिवादन करण्यात आले. कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ही मैफल रंगली. ‘ए दिल ए नादान’ या गाण्याने रसिकांना मंत्रमुग्ध केले.
गायिका मनीषा निश्चल यांच्यासह गायक गफार मोमिन, अजय राव, प्रसाद कारूळकर यांनी गायन केले. अमेय ठाकूरदेसाई (तबला), प्रणव हरिदास (बासरी), सिद्धार्थ कदम (रिदम मशिन, पॅड), झंकार कानडे (कीबोर्ड), अक्षय कावळे (कीबोर्ड), हनुमंत रावडे (ढोलक) यांनी साथसंगत केली. निरंजन ठाकूर यांनी निवेदन केले. ध्वनीव्यवस्था आयान मोमिन, तर प्रकाशव्यवस्था विजय चेन्नुर यांनी सांभाळली.