शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्षाध्यक्ष मी अन् यांनी कसे काय तिकीट दिले?;शरद पवारांनी उडवली अजित पवारांची खिल्ली
2
"मुख्यमंत्री नाही, पण ५ मिनिटांसाठी तरी पंतप्रधान होणार", महादेव जानकरांनी व्यक्त केला विश्वास 
3
अभिनेत्री कश्मीरा शाहचा भीषण अपघात, रक्ताने माखले कपडे; नेमकं काय घडलं?
4
"कुटुंबातील महिलांमध्ये वाद निर्माण करण्याची काँग्रेसची योजना", 'गृहलक्ष्मी'वरून चित्रा वाघ यांचा निशाणा
5
Basmath Vidhan Sabha 2024: दोन राष्ट्रवादीत लढत! जयप्रकाश दांडेगावकर vs राजू नवघरे रिंगणात... गुरूच्या विरोधात शिष्य!
6
दादर-माहीमची निवडणूक अटीतटीची होईल की एकतर्फी? अमित ठाकरे म्हणाले, "मी तुम्हाला..."
7
शाळांच्या सुट्टीबद्दल शिक्षण आयुक्तालय आणि महापालिकेचा परस्परविरोधी निर्णय
8
'मुन्नाभाई MBBS'मधला स्वामी आता दिसतो खूपच वेगळा, लेटेस्ट फोटो पाहून चाहते झाले अवाक्
9
Fact Check: 'जर्सी नं. 7' धोनीच्या सन्मानार्थ RBI ७ रुपयांचं नाणं आणणार?; व्हायरल दाव्यामागील सत्य वेगळंच
10
Maharashtra Election 2024 Live Updates: महाराष्ट्राची निवडणूक ही विचारसरणीची निवडणूक- राहुल गांधी
11
खासगी विमान, ३० हून अधिक लक्झरी कार्स, परदेशात मालमत्ता; नायजेरियाच्या राष्ट्रध्यक्षांची संपत्ती किती?
12
विलंबामुळे वाढले टेन्शन, हुकणार होती लग्नाची गाडी; मुंबईवरून निघालेल्या नवरदेवासाठी थांबविली रेल्वे!
13
ऑनलाइन तेल पडले महागात! अमेरिकेत मुलाची केस गळती, वाशीतल्या वडिलांना लाखोंचा गंडा
14
कैलाश गहलोत भाजपात जाणार, रविवारी दिला होता मंत्रिपदासह आपचा राजीनामा
15
संजय निरुपम यांनाच वोट करा! जान्हवीचा व्हिडिओ पाहून चाहत्यांचा संताप, म्हणाले- "किती पैसे मिळाले?"
16
Sankashti Chaturthi 2024: तुमचा आज संकष्टीचा उपास आहे? जाणून घ्या चंद्रोदयाची वेळ आणि नियम!
17
एकावर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' कंपनी; शेअरमध्ये तुफान तेजी, कोणता आहे हा स्टॉक?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी पुढील निवडणूक पाहणार की नाही..."; रोहिणी खडसेंसाठी एकनाथ खडसेंची भावनिक साद
19
जळगाव शहर मतदारसंघातील अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार 
20
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 

निवडणुकीवरून संमेलनाध्यक्षांचा परस्परविरोधी सूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2018 2:03 AM

डॉ. अरुणा ढेरे, डॉ. प्रेमानंद गज्वी यांची मुलाखत : पुरस्कार हा कलाकृतीचा सन्मान

पुणे : ‘निवडणूक प्रक्रियेमुळे अनेक मान्यवर क्षमता असूनही या पदापासून वंचित राहिले आहेत. यंदा एकमताने अध्यक्ष निवडून आणला ही चांगली सुरूवात आहे, असे नियोजित संमेलनाध्यक्ष डॉ. अरूणा ढेरे यांनी सांगताच ‘देशाचा पंतप्रधान जर लोकशाही पद्धतीने निवडून दिला जातो तर मग संमेलनाध्यक्ष का निवडू नये? हे साहित्य परिषदेच्या अपरिपक्वतेचे लक्षण आहे अशी विरोधी भूमिका नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी मांडली.

अखिल भारतीय साहित्य संमेलनाची निवडणूक लोकशाही पद्धतीने कि सन्मानाने व्हावी, यावर डॉ. अरूणा ढेरे आणि साहित्य संमेलनाध्यक्षाचे उमेदवार राहिलेले नियोजित नाट्यसंमेलनाध्यक्ष डॉ. प्रेमानंद गज्वी यांनी एकाच व्यासपीठावर परस्परविरोधी सूर आळविल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होते, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात डॉ. अरूणा ढेरे आणि डॉ. प्रेमानंद गज्वी यांच्या सत्कार सोहळा आणि मुलाखतीचे. डॉ. मनोहर जाधव यांनी विचारलेल्या प्रश्नांना ढेरे आणि गज्वी यांनी समर्पक उत्तरे देत कार्यक्रम रंगवला. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ. एन.एस उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, ललित कला केंद्राचे प्रवीण भोळे, मराठी विभागाचे तुकाराम लोमटे आणि सतीश आळेकर उपस्थित होते.कविता म्हणजे अवघड वाड्:मय प्रकारडॉ. अरूणा ढेरे यांनी वडिल डॉ. रा.चिं ढेरे यांच्या काही आठवणी उलगडल्या. कवितेबद्द्ल सांगताना त्या म्हणाल्या, कविता ही सर्वात अवघड वाडमय प्रकारापैकी एक आहे. कारण यात कमीत कमी शब्दातं जास्तीत जास्त गोष्टी सांगायच्या असतात. त्यामुळे सगळ्यात सोपी वाटणारी पण सगळ्यात अवघड असणारी कविता असते.प्रेमानंद गज्वी यांनी सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतलेल्या ‘छावणी’ या आपल्या नाटकाबददल आपली बाजू स्पष्ट केली. या नाटकातील काही संदर्भ देत त्यांनी आजच्या परिस्थितीवर भाष्य केले. ‘जातिव्यवस्था हे आपल्याकडचे सर्वात दुखणे आहे. त्यामुळे सगळ्याच जातींना त्यांच्या संख्येच्या प्रमाणात आरक्षण द्या आणि पूर्णच देशच आरक्षित करून टाका अशी उपरोधिक टिप्पणी त्यांनी केली. मी मनोरंजनवादी, प्रयोगशील आणि विचारवादी असे तीन प्रकारचे साहित्य मानतो. तसेच दलित साहित्याने दलितांचा फारसा फायदा झाला नाही उलट बाबासाहेबांची चळवळ आपण मागे नेली असे गज्वी म्हणाले. पुरस्कार वापसीबदद्ल बोलताना डॉ. ढेरे आणि गज्वी दोघांनीही या कृतीला विरोध दर्शविला.‘पुरस्कार हा आपल्या कलाकृतीचा सन्मान आहे. तो परत करून आपण कोणाचा निषेध करतो? ज्यांनी पुरस्कार जाहीर केला त्यांचा की ज्यांच्या काळात पुरस्कार परत करत आहोत त्या सरकारचा? याचा विचार करायला हवा याकडे गज्वी यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Puneपुणे