श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टने आयोजित केलेला भाद्रपद गणेशोत्सव दि. ७ ते १३ सप्टेंबर या कालावधीत उपविभागीय अधिकारी संतोषकुमार देशमुख यांच्या आदेशानुसार फक्त विश्वस्त मंडळाच्या उपस्थितीत पार पडला. या वेळी देवस्थानचे विश्वस्त मंडळ डॉ. संतोष दुडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, शेखर देव, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबणीस संतोष रणपिसे उपस्थितीत नियोजन करण्यात आले होते. गणेशोत्सव काळात मंदिर व परिसरात केलेली फुलांची आकर्षक सजावट, विद्युत रोषणाई भाविकांचे लक्ष वेधून घेत होती. प्रथा व परंपरेनुसार श्रींना अभिषेक पूजा, महापूजा, महानैवेद्य व सहस्रावर्तने, श्रींच्या उत्सव मूर्तीचे प्रस्थान, सांप्रदायी आरत्या, श्रींच्या उत्सव मूर्तीची फुलांची आकर्षक सजावट केलेल्या चारचाकीतून व्दारयात्रा, षष्ठीच्या दिवशी दहीहंडी, सप्तमीच्या दिवशी श्रीनारायण महाराज पुण्यतिथी आदी कार्यक्रम झाले.
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बळवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिर व परिसरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. कोविडच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या आदेशानुसार यंदाचा भाद्रपद गणेशोत्सव शांततेत पार पडल्याबद्दल पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांचा देवस्थानच्या वतीने सत्कार करण्यात आला.
श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने भाविक, भक्तगण, ग्रामस्थ व अशा अनेक गणेशभक्तांच्या साठी ऑनलाईन दर्शन सुविधा चालू केलेली आहे, त्याचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
रांजणगाव देवस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांचा व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
140921\img-20210912-wa0151.jpg
देवस्थानच्या वतीने पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांचा सत्कार करण्यात आला.