बाणेर : बाणेरमधील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे उद्घाटन होऊनही रस्त्याअभावी ते धूळ खात पडून आहे. ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रातील काही साहित्य चोरीला गेले असून, केंद्राच्या परिसराची व इमारतीची दुरवस्था झाली आहे.बाणेरमधील साईदत्त सोसायटीलगत सर्व्हे नंबर १६७ मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी दोन मजली विरंगुळा केंद्र बांधण्यात आलेआहे. या इमारतीसाठी दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे.विरंगुळा केंद्राचा रस्त्याची जागा व सोसायटी यांच्यामध्ये सुरक्षा भिंत नाही. यामुळे ही जागा सोसायटीचाच एक भाग झाली आहे.विरंगुळा केंद्राकडे जाणाºया रस्त्याच्या जागेवार सोसायटीचे खासगी गेट आहे. खासगी सुरक्षारक्षक असल्याने विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांना वापरता येत नाही. विरंगुळा केंद्रामध्ये सांस्कृतिक हॉल, पहिल्या व दुसºया मजल्यावर दोन कक्ष बांधण्यात आले आहेत. परंतु विरंगुळा केंद्राच्या फरशी, स्वच्छतागृह, तसेच पाणी व्यवस्था आदी कामे अपूर्ण आहेत. विद्युत व्यवस्थेची दुरवस्था झाली आहे. कामअपूर्ण असल्याने याचा वापर करता येत नाही.या इमारतीचे उद्घाटन विधिमंडळ पक्षनेते अजित पवार यांच्या हस्ते ४ जानेवारी २0१७ रोजी करण्यात आले होते. परंतु प्रशासकीय उदासीनतेमुळे विरंगुळा केंद्राचे उद्घाटन होऊनही अद्याप विरंगुळा केंद्र सुरू झाले नाही. विरंगुळा केंद्रामध्ये जाण्यासाठी स.नं. १६७ लगत रस्ता नकाशामध्ये उपलब्ध आहे. परंतु प्रत्यक्षात या रस्त्यावर खासगी सोसायटीचा ताबा असल्याने विरंगुळा केंद्रात जाता येते नाही.ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्राचे काम पूर्ण झाल्यानंतर उद्घाटन होणे अपेक्षित होते. परंतु प्रशासनाने घाईत उद्घाटन उरकल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होणार नाही तसेच राहिलेले अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून विरंगुळा केंद्र वापरात येण्यासाठी प्रयत्न करू.- ज्योती कळमकर, नगरसेविकाज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्रामध्ये अनेक अडचणी आहेत. परंतु अडचणी दूर करून ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा केंद्र वापरता येईल, यासाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. - स्वप्नाली सायकर, नगरसेविकाविरंगुळाच्या उर्वरित कामासाठी येत्या आर्थिक वर्षात तरतूद करून राहिलेली कामे पूर्ण करण्यात येतील. यानंतर विरंगुळा केंद्र सर्वांसाठी खुले करण्याचा आमचा प्रयत्न आहे. भवन विभागाचे अभियंता मंदार धायगुडे म्हणाले, की बाणेर येथील ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र अॅमिनिटी स्पेसमध्ये उभारण्यात आले आहे. यासाठी ९ मीटरचा रस्ता आहे. हा रस्ता सुरू करण्यात येईल. आर्थिक वर्षात उर्वरित कामे पूर्ण करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. कामे पूर्ण करून विरंगुळा केंद्र वापरायोग्य करण्यात येईल. - अमोल बालवडकर, नगरसेवक
विरंगुळा केंद्र वापराविना पडून, बाणेरमधील स्थिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2018 3:42 AM