सर्वप्रथम लसीकरणाच्या एकूणच नियोजनामध्ये ढिसाळपणा असून तो प्रशासनाने त्वरित दूर केला पाहिजे.
लसीकरण केंद्रावर पहाटेपासून रांगा लागलेल्या असतात. त्यानंतर लसीकरण केंद्राचे कर्मचारी दहा वाजता आल्यानंतर सांगतात की, आज लस उपलब्ध नाही. यांमुळे रांगेत थांबलेल्या नागरिकांना परत जावे लागते. लस उपलब्ध होणार आहे की नाही, याची माहिती आदल्या दिवशीच वर्तमानपत्र, सोशल मीडिया आदींचा वापर करून नागरिकांना दिली पाहिजे. जेणेकरून नागरिक लसीकरण केंद्रावर गर्दी करणार नाहीत व त्यांना मनस्ताप सहन करावा लागणार नाही.
तसेच, १ मेपासून १८ वर्षांवरील लसीकरण सुरू केल्यामुळे होणारी गडबड टाळण्यासाठी आता उरलेल्या दिवसांत प्राधान्याने ४५ वरील व्यक्तींना दुसरा डोस देण्यात यावा. लसीकरण केंद्रांवर नागरिक गर्दी करत आहेत, यात बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे, यातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनाची राहील तसेच याबाबत आयुक्तांची देखील भेट घेणार असल्याचे नागपुरे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
कोट:
पहाटेपासून ज्येष्ठ नागरिक रांगेत उभे असतात. दहा वाजता कर्मचारी येऊन सांगतात की आज लस उपलब्ध नाही. यामुळे नागरिकांना नाहक त्रास होतोच, शिवाय पुन्हा दुसऱ्या दिवशी रांगेत उभे राहावे लागते.
- मंजूषा नागपुरे, नगरसेविका
फोटो ओळ: लसीकरण केंद्रावर योग्य नियोजन करून नागरिकांना लस उपलब्ध करून द्यावी, याबाबत नगरसेविका मंजूषा नागपुरे यांनी आरोग्य विभागाला निवेदन दिले.